शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोना लसीमुळे खरंच हार्ट अटॅक येतो का?; रिसर्चमधून समोर आलं मोठं 'सत्य'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2023 12:34 PM

1 / 8
पूर्वी आपण अनेकदा मोठ्या माणसांना हार्ट अटॅक आल्याच्या बातम्या वाचायचो किंवा ऐकायचो. परंतु काही काळापासून तरुण आणि कमी वयाच्य़ा मुलांमध्ये हार्ट अटॅक आणि हार्ट स्ट्रोक येण्याचे प्रमाण वाढले आहे. या वाढत्या केसेस पाहता काही लोकांनी हे कोरोना लसीमुळे झाल्याचं म्हटलं आहे.
2 / 8
एवढच नाही तर लोक यावर वेगवेगळे दावेही करत आहेत. काही लोक असं म्हणतात की, कोरोना लस घाईघाईने बनवली गेली. जेवढे संशोधन व्हायला हवं होतं तेवढं झालेलं नाही. अशा परिस्थितीत हार्ट अटॅक येण्याचं हे सर्वात मोठं कारण आहे.
3 / 8
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या प्रकरणात काही तथ्य आहे आणि त्या सर्व खोट्या अफवा आहेत. अलीकडील संशोधनाने या विषयावर आपलं मत उघडपणे व्यक्त केलं आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
4 / 8
NBT मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीत या रिसर्चचा उल्लेख करण्यात आला आहे. रिसर्चनुसार, मेरीलँड विद्यापीठातील संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. फहीम युनूस यांनी या विषयावर एक रिसर्च शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, कोरोनाचा बूस्टर डोस गंभीर आजारापासून 95 टक्क्यांपर्यंत बचाव करतो.
5 / 8
बूस्टर डोस घेतल्यावर शरीरावर काही दुष्परिणाम दिसू शकतात. जसं ताप, अंगदुखी इ. दुसरीकडे, हृदयविकाराचा झटका आल्याची ही पूर्णपणे अफवा आहे. रिसर्चमध्ये हृदयविकाराचा संबंध नाही.
6 / 8
हा रिसर्च एकूण 5081 लोकांवर करण्यात आला आहे. BNT162b2 mRNA कोविड-19 लस रिसर्चमध्ये घेण्यात आली. या रिसर्चमध्ये असं समोर आलं आहे की, लस घेतल्यानंतर फक्त थोडा त्रास होतो आणि काही दुष्परिणाम दिसत नाहीत.
7 / 8
कोरोनाचा बूस्टर डोस इतका चांगला आहे की पहिल्या दोन डोसच्या तुलनेत तो 95 टक्के सुरक्षितता आणि गंभीर आजारांपासून संरक्षण देतो. अभ्यासात, त्याच्या दुष्परिणामांवर विशेष लक्ष दिले गेले आहे. हार्ट अटॅकचा काही संबंध नाही.
8 / 8
बूस्टर डोस घेतल्यावर अंगदुखी, डोकेदुखी आणि थकवा यासारखे दुष्परिणाम मानवी शरीरावर दिसून आले आहेत. भारतात काही काळापासून हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. कोराना लसीशी संबंध जोडून बरेच लोक याकडे पाहत आहेत. पण या अभ्यासातून असं काही नसल्याचं स्पष्ट झालं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस