शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Virus : गर्भातील बाळासाठी किती धोकादायक असू शकतो कोरोनाचा नवा व्हेरियंट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 17:44 IST

1 / 8
भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जवळपास १०००च्या पुढे गेली आहे. यामध्ये सर्वाधिक ४३० रुग्ण केरळमध्ये आणि महाराष्ट्रात २०९ आढळले असून, दिल्लीतही १०४ सक्रिय रुग्ण नोंदवले गेले आहेत. कोरोना संसर्गाची ही वाढती संख्या चिंतेची बाब आहे. विशेषतः नवीन 'NB.1.8.1' प्रकार ओमिक्रॉनच्या 'JN.1' प्रकारामधून विकसित झाला आहे.
2 / 8
तज्ज्ञांच्या मते घाबरण्याची गरज नसली तरी, ज्यांचे आरोग्य आधीपासूनच कमकुवत आहे, जसे की वृद्ध, गंभीर आजारांनी ग्रस्त किंवा प्रतिकारशक्ती कमी असलेले लोक यांच्यासाठी ही परिस्थिती अधिक जोखमीची ठरू शकते. जर, एखाद्या गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाली तर, हा नवा व्हेरियंट गर्भातील बाळासाठी किती धोकादायक असू शकतो?
3 / 8
गर्भधारणेदरम्यान महिलांची प्रतिकारशक्ती सामान्यतः थोडी कमी होते, ज्यामुळे कोणताही संसर्ग अधिक गंभीर परिणाम दाखवू शकतो. त्यामुळे सध्याच्या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरोदर महिलांनी अधिक सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे.
4 / 8
कोरोना संसर्ग झाल्यास गरोदर महिलांमध्ये श्वसनास त्रास, ताप, न्यूमोनिया अशी लक्षणे दिसू शकतात. बाळावर थेट परिणाम क्वचितच दिसून येतो, मात्र काही प्रकरणांमध्ये अकाली प्रसूती किंवा कमी वजनाचे बाळ जन्माला येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
5 / 8
तज्ज्ञांच्या मते, कोरोना प्रतिबंधक लस गर्भवती महिलांसाठी सुरक्षित असून ती आई व बाळ दोघांनाही संसर्गापासून संरक्षण देते. त्यामुळे लसीकरण करण्याचा सल्ला दिला जातो.
6 / 8
गर्भधारणेदरम्यान कोरोना टाळण्यासाठी काही उपाय महत्त्वाचे आहेत. घराबाहेर पडताना मास्कचा वापर करण्याची सवय लावून घ्या. आवश्यकता नसल्यास शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. नियमितपणे हात धुवा किंवा सॅनिटायझर वापरा.
7 / 8
यासोबतच संतुलित व पौष्टिक आहार घ्या, जेणेकरून रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहील. डॉक्टरांचा सल्ला वेळोवेळी घ्या आणि लसीकरणाबाबत माहिती घ्या.
8 / 8
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे गरजेचे आहे, विशेषतः ज्या महिला मातृत्वाच्या प्रवासात आहेत, त्यांच्यासाठी ही काळजी अधिक आवश्यक आहे. सजग राहून आपण स्वतःला आणि बाळाला सुरक्षित ठेवू शकतो.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPregnancyप्रेग्नंसीpregnant womanगर्भवती महिला