CoronaVirus News : भय इथले संपत नाही! 'दीर्घकाळ कोरोना संसर्ग हा गंभीर धोका; Heart Beat वर होऊ शकतो परिणाम'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 15:28 IST
1 / 15गेल्या दोन वर्षांत संपूर्ण जगाला कोरोनाने हादरवले आहे. या जीवघेण्या आजाराने लाखो लोकांचा बळी घेतला आहे, तर कोट्यवधी लोकांना याची लागण झाली आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 2 / 15आजारातून बरे झाल्यानंतरही लोकांमध्ये पोस्ट कोविडची अनेक लक्षणे दिसू लागली आहेत. त्यांना अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो, ज्यातून बरे होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. अलीकडेच कोरोनाच्या तिसर्या लाटेने भीतीचे वातावरण आहे.3 / 15ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने अनेक देशांमध्ये कहर केला आहे. दरम्यान, एक संशोधन समोर आले आहे ज्यामध्ये असं म्हटलं आहे की ज्या लोकांना दीर्घकाळ कोरोनाची लागण झाली आहे त्यांच्या शरीरावर मोठा दुष्परिणाम झाला आहे आणि त्यांना गंभीर धोका आहे. 4 / 15दीर्घकाळ संसर्ग झाल्यानंतर अशा रुग्णांच्या Heart Beat वरही परिणाम होऊ शकतो. hindustannewshub च्या वृत्तानुसार, एका संशोधनात दिलेल्या माहितीनुसार, दीर्घकाळापर्यंत कोरोना संसर्गामुळे शरीराच्या वेगस नर्व्हच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि काम करण्याची क्षमता कमी होते. 5 / 15हृदयाच्या ठोक्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. वेगस नर्व आपल्या हृदयाचे ठोके आणि बोलण्याची क्षमता देखील निर्धारित करते. ही आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाची आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो.6 / 15हृदयाचे ठोके, बोलण्याची क्षमता, घाम येणे आणि शरीराच्या इतर हालचालींवर नियंत्रण ठेवले जाते. दीर्घकाळापासून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर केलेले हे संशोधन स्पेनमधील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल जर्मन ट्रायस आय पुंजोलच्या संशोधकांनी केले आहे. 7 / 15संशोधकांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाची लागण दीर्घकाळ राहिल्यास रुग्णांच्या वेगन नर्व्सच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे रुग्णांना बोलण्यास त्रास होणे, अन्न गिळण्यास त्रास होणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके असामान्य होणे अशी लक्षणे दिसू शकतात.8 / 15संशोधक डॉ. जेम्मा लाडोस यांनी या संशोधनात समोर आलेल्या परिणामांमुळे दीर्घकाळापासून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना भेडसावणाऱ्या इतर समस्या समजून घेण्यास मदत होऊ शकते असं म्हटलं आहे.9 / 15डॉ. लाडोस म्हणाले की, दीर्घकालीन कोरोना संसर्ग हा शरीराच्या अनेक भागांना निष्क्रिय करणारा सिंड्रोम आहे, जो 10-15 टक्के लोकांना प्रभावित करू शकतो. ही लक्षणे आठवडे ते वर्षभर टिकू शकतात.10 / 15संशोधनात 348 रुग्णांचा संशोधन पथकाने समावेश केला होता. या दरम्यान, सुमारे 66 टक्के रुग्णांनी नर्वच्या कार्यक्षमतेत घट झाल्यामुळे किमान एक लक्षण 14 महिने कायम राहिल्याची तक्रार केली. 11 / 15एप्रिल 2022 मध्ये लिस्बन येथे होणाऱ्या युरोपियन काँग्रेस ऑफ क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी अँड इन्फेक्शियस डिसीजेस (ECCMID 2022) मध्ये या संशोधनासंबंधीचा व्यावहारिक अभ्यास सादर केला जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 12 / 15कोरोनातून बरं झाल्यावरही हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका असल्याचा आता दावा करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग होताच शरीरातील अनेक अवयवांवर त्याचा परिणाम होतो. विशेषत: त्याचा हृदयावर अधिक परिणाम होतो.13 / 15अमेरिकेतील एका नवीन संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, कोविड संसर्गातून बरे झाल्यानंतरही रुग्णांना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हार्ट फेल्योरचा धोका असतो. हा धोका अशा लोकांना देखील होतो ज्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.14 / 15वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी एका वर्षाहून अधिक काळ कोरोना झालेल्या 1 लाख 53 हजार 760 लोकांच्या आरोग्याचा मागोवा घेतला. या डेटाची 56 लाखांहून अधिक लोकांशी तुलना करण्यात आली. या लोकांना कधीच कोरोना संसर्ग झाला नव्हता.15 / 15संशोधनात शास्त्रज्ञांना आढळले की जे रुग्ण कोरोना संसर्गाच्या 30 दिवसांत बरे झाले, त्यांना हार्ट स्ट्रोकचा धोका 1.5 पट जास्त आहे. याव्यतिरिक्त, हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 1.6 पटीने वाढला आहे.