By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 17:48 IST
1 / 8हार्ट अॅटॅकपासून (Heart Attack) वाचण्यासाठी रक्त पातळ करण्याचे औषध अॅस्पिरिन (Aspirin) मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आता हेल्थ एक्स्पर्टनी लोकांना या सवयीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. US प्रिवेंटिव सर्विसेज टास्क फोर्सने एक गाईडलाईनसाठी नवीन ड्राफ्ट तयार केला आहे. 2 / 8यामध्ये म्हटले आहे की, ज्या वृद्धांना किंवा वयस्करांना हृदयविकार नाही, त्यांना पहिल्या हार्ट अॅटॅकपासून वाचण्यासाठी दररोज अॅस्पिरिन घेण्याची गरज नाहीय. धक्कादायक बाब म्हणजे याच पॅनलने 2016 मध्ये हारर्ट अॅटॅक आणि स्ट्रोकपासून वाचण्यासाठी अॅस्पिरिन घेण्याचा सल्ला दिला होता. 3 / 8तेव्हा पॅनेलचे म्हणणे होते की, 50-60 वर्षांचे लोक दररोज अॅस्पिरिन घेऊ शकतात. यामुळे हार्ट अॅटॅकच नाही तर कोलेस्ट्रॉल कॅन्सरपासून देखील वाचता येईल. मात्र, आता नव्या ड्राफ्टमध्ये पॅनलने याच्या अगदी विरुद्ध सल्ला दिला आहे. यामध्ये बदल करण्यात आला असून यावर आणखी संशोधन आणि पुरावे गोळा करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. 4 / 860 वर्षांवरील लोक ज्यांना आधी हार्ट अॅटॅक आलेला नाही, त्यांना अॅस्पिरिन औषधाने कोणताही फायदा होणार नाही. मात्र, यामुळे रक्तस्त्रावाचा धोका आणखी वाढेल. पॅनेलने पहिल्यांदाच अॅस्पिरिन बाबत अशाप्रकारचा ड्राफ्ट बनविला आहे. पॅनेलनुसार 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना या औषधाचा थोडा अधिक फायदा होऊ शकतो. तर 50 वर्षांपेक्षा जास्त लोकांमध्ये याचा कोणताही फायदा दिसलेला नाही. 5 / 8ही गाईडलाईन खासकरून उच्च रक्तदाब, हाय कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा आणि अन्य आजार असलेल्या लोकांसाठी आहे. कारण या साऱ्या कारणांमुळे हार्ट अॅटॅकचा धोका वाढतो. यामुळे अॅस्पिरिन औषध घेण्याआधी किंवा थांबविण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. 6 / 8टास्क फोर्सचे सदस्य डॉ जॉन वोंग यांनी सांगितले की, Aspirin शरीरला गंभीर नुकसान पोहोचवू शकते. कारण वयानुसार याचा धोका वाढत जातो. 7 / 8अॅस्पिरिन हे एक पेन किलर औषध आहे. मात्र, ते ब्लड थिनरचे देखील काम करते. हे औषध ब्लड क्लॉटिंगचा धोका कमी करते. कमी डोस घेतला तरी या औषधाचे दुष्परिणाम देखील आहेत. 8 / 8या औषधामुळे पचन संस्था किंवा अल्सरमधून रक्तस्त्रावदेखील होऊ शकतो. यामुळे जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळेच हे तज्ज्ञ हे औषध घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगत आहेत.