By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 15:17 IST
1 / 9पणजी : संत जॉन बाप्तिस्ता म्हणजेच जुवांव बाप्तिस्ता यांचा जन्मदिवस गोव्यात सांजाव म्हणून साजरा केला जातो. 2 / 9गोव्यात आज रविवार साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे सांजाव सर्वत्र साजरा करण्यात येत आहे . 3 / 9हल्ली अनेक ठिकाणी स्विमिंग पूल आढळतात, या स्विमिंग पुलमध्येही उड्या मारून उत्सवाचा आनंद लुटला जातो. 4 / 9डोक्यावर काटेरी मुकुट, गळ्यात घुमट व फुलांच्या माळा, हातात माडाचे पिडे (फांदी), व अन्य वाद्ये वाजवित-नाचत-गात लोक गटागटाने फिरतात. राज्यातील विहिरी, तलावात उड्या मारून मौजमस्ती करतात. 5 / 9डोक्यावर गोलाकार आकाराची चक्रे सजवतात. त्यांना कॉपेल म्हणतात. कॉपेल फुलांनी सजवतात. वातावरण आनंदी असते. 6 / 9या आनंदात दिवस कधी संपतो ते कळत नाहीत. निसर्गाला जपण्याचा संदेशही सांजावद्वारे दिला जातो.7 / 9 या दिवशी सासरवाडीला येणा-या जावयाचा मोठा सन्मान केला जातो. संपूर्ण गोव्यातच सांजाव साजरा केला जात असला तरी उत्तर गोव्यातील शिवोली येथे बोट फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते.8 / 9या ठिकाणी बोटी आकर्षकपणे सजविल्या जातात.विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले जातात. 9 / 9यंदा हा कार्यक्रम शिवोली पारंपारिक सांजाव बोट फेस्टिव्हल सांस्कृतिक समिती आणि कला आणि संस्कृती खाते यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला आहे. (सर्व फोटो - जयेश नाईक)