By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 20:48 IST
1 / 6पणजी : ख्रिस्ती बांधवांचा नाताळ सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून गोव्यात सर्वत्र नाताळाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. 2 / 6 बाजारपेठेत आकर्षक भेटवस्तू आणि जिंगल बेल्स विक्रीसाठी दाखल झाले असून खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली आहे.3 / 6शहरातील प्रमुख चर्चमध्ये यासाठी सजावटीचे आणि गोठ्याचे काम अंतिम टप्प्यात पोचले आहे. सणाचे आकर्षण असलेला येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा (गोठा) तयार करण्यात तरुणाई मग्न आहे. 4 / 6शहरातील प्रमुख चर्चमध्ये यासाठी सजावटीचे आणि गोठ्याचे काम अंतिम टप्प्यात पोचले आहे. सणाचे आकर्षण असलेला येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा (गोठा) तयार करण्यात तरुणाई मग्न आहे. 5 / 6 बदलत्या काळात सार्वजनिक नाताळगोठे गावोगावी जरी दिसत असले तरीही प्रत्येकांच्या घरात किंवा अंगणात खासगी नाताळगोठे उभारण्याचे प्रमाण वाढले आहे. 6 / 6शहरातील भेटवस्तूंच्या दुकानांतही ख्रिसमसचा प्रभाव जाणवू लागला आहे. अनेक आकर्षक भेटवस्तू आणि शुभेच्छा कार्ड्स जिंगल बेल, ख्रिसमस ट्री ची प्रतिकृती, फुगे आणि अन्य सजावटीचे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. (सर्व फोटो : पिनाक कल्लोळी, अरविंद टेंगसे.)