रस्ते, रेल्वे, हवाई मार्गाबरोबर आता गोव्याला जाण्यासाठी झाला आणखी एक पर्याय उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 17:48 IST
1 / 4रस्ते, रेल्वे, हवाई मार्गाबरोबर आता गोव्याला जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. आता तुम्ही समुद्रमार्गेही गोव्याला जाऊ शकता. 2 / 4 गडकरींनी काल बैठक घेऊन गोव्यातील महत्वाच्या बंदरांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. 3 / 4 1994 साली दमानिया शिपिंगने मुंबई-गोवा दरम्यान फेरी बोट सेवा चालू केली होती. या बोटींमध्ये विमानासारखी आसनव्यवस्था होती. या बोटीने त्यावेळी मुंबईहून गोव्याला जायला सात तास लागायचे. 4 / 4साठ-सत्तरच्या दशकात कोकण किनारपट्टीवर पणजी ते मुंबई दरम्यान फेरी बोट सेवा चालायची. 2004 सालापासून गोवा-मुंबई समुद्र मार्गावरील जलप्रवास बंद झाला.