By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 14:39 IST
1 / 5इंग्लिश प्रीमिअर लीगमधील क्लब चेल्सीने गुरूवारी विक्रमी किंमतीत स्पेनचा गोलरक्षक केपा अरिझाबॅलगा आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. चेल्सीने 23 वर्षीय केपासाठी 80 कोटी युरो किमत ( 6,36,54,95,408 भारतीय चलन) मोजली. अॅटलेटिको माद्रिद क्लबचा हा माजी खेळाडू जगातील सर्वात महागडा गोलरक्षक ठरला आहे. 2 / 5याआधी हा विक्रम ब्राझिलच्या अॅलिसन बेकरच्या नावावर होता. त्याला लिव्हरपूलने 65 कोटी युरो ( 5,72,90,43,046.35 भारतीय चलन) या किमतीत लिव्हरपूलने करारबद्ध केले होते.3 / 5ब्राझिलचाच एडरसन 2017 मध्ये मँचेस्टर सिटी क्लबशी करारबद्ध झाला. त्याला 35 कोटी युरोत ( 3,08,52,61,278.75 भारतीय चलन) करारबद्ध करण्यात आला.4 / 5जगातील अव्वल दहा महागड्या गोलरक्षकांमध्ये गीगी बफन, मॅन्युयल नॉयर आणि डेव्हिड डी जी यांचाही क्रमांक येतो. या तिघांना अनुक्रमे युव्हेंटस, बायर्न म्युनिच आणि मँचेस्टर युनायटेड यांनी करारबद्ध केले.5 / 5 केपाने स्पेनच्या सर्व वयोगटातील संघांचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने 19 वर्षांखालील युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेतही स्पेनचे प्रतिनिधीत्व केले होते. नोव्हेंबरमध्ये कोस्टा रिकाविरूद्धच्या मैत्रीपूर्ण लढतीत त्याने स्पेनच्या वरिष्ठ संघाकडून पदार्पण केले होते.