By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 11:15 IST
1 / 6स्पेनचा फुटबॉलपटू कॅस्क फॅब्रेगास आणि डॅनिएला सेमान यांनी मे महिन्यात विवाह केला. मात्र, लीग मोसम आणि फुटबॉल विश्वचषक स्पर्धेमुळे त्यांना अनेकांना बोलावता आले नाही. त्यामुळे या नवविवाहित जोडप्याने विशेष पार्टीचे आयोजन केले होते. त्यांच्या या पार्टीत आर्सेनल, चेल्सी आणि बार्सिलोना क्लबचे आजी-माजी दिग्गज सहकुटूंब उपस्थित राहिले होते. 2 / 6चेल्सी क्लबचे माजी फुटबॉलपटू जॉन टेरी पत्नी टोनीसह या पार्टीला हजर होते. 3 / 6बार्सिलोना क्लबचा सहकारी लिओनेल मेस्सीनेही पत्नी अँटोनेला रोकुझ्झोसह पार्टीत हजेरी लावली.4 / 6थिएरी हेन्री यानेही पत्नी आंद्रेया राजॅकीच सह पार्टीत सहभागी होत सेलेब्रिटीच्या यादीत भर घातली.5 / 6बार्सिलोनाचा लुईस सुआरेझ आणि पत्नी सोफीया बाल्बी यांनी दिलेली पोज.6 / 6बार्सिलोनाचा दिग्गज फुटबॉलपटू कार्लोस प्युयोल गर्लफ्रेंड व्हॅनेसा लोरेंझोसह कॅमेरांच्या गराड्यातून वाट काढली.