मकरसंक्रांत स्पेशलः मकरसंक्रांतीला वेगवेगळ्या राज्यात तयार केले जाणारे पदार्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 13:55 IST
1 / 9आज मकर संक्रांत! या निमित्ताने भारतातल्या वेगवेगळ्या भागात आपापल्या संस्कृतीनुसार पदार्थ तयार केले जातात. आम्ही तुम्हाला अशाच काही खास पदार्थांबद्दल सांगणार आहोत. या पदार्थाचे नाव गजक असं आहे. मध्यप्रदेशात हा पदार्थ मकरसंक्रांतीच्या दिवशी घराघरात तयार केला जातो. उत्तर प्रदेशात सुद्धा हा पदार्थ वेगळ्या स्टाईलने तयार केेला जातो. 2 / 9उत्तरप्रदेशात मकरसंक्रांतीच्या दिवशी खिचडी खाण्याचे फार महत्व आहे. 3 / 9अपुलू हा पदार्थ दक्षिण भारतात आजच्या दिवशी तयार केला जातो. तांदळांच पीठ, गुळ यांचा वापर करून हा पदार्थ तयार केला जातो. 4 / 9महाराष्ट्राप्रमाणेच बिहार, झारखंड या राज्यात पांढरे तिळ आणि गुळ यांचा वापर करून तिळाचे लाडू तयार केले जातात. 5 / 9मकरा चौला हा पदार्थ ओडीसा राज्यात तयार केला जातो. दूध आणि फळांचा वापर करून ही डीश तयार केली जाते. 6 / 9फेनी हा पदार्थ राजस्थानात तयार केला जातो. 7 / 9मुरूक्कू हा चकलीच्या आकारासारखा आकार असलेला पदार्थ तामिळनाडू राज्यात तयार केला जातो. 8 / 9हा एक पारंपारीक बंगाली पदार्थ आहे. या पदार्थाचे नाव पोली पिठा आहे. दुधापासून हा गोड पदार्थ तयार केला जातो. 9 / 9आपल्या सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ पुरणपोळी संपूर्ण महाराष्ट्रातील तयार केला जातो.