1 / 5कितीदा भाजी चिरताना आपण टोमॅटो चिरतो. त्या टोमॅटोचा रस चेहर्याला लावा. टोमॅटो चिरुन चेहर्यावर घासा. चेहरा टॅन झाला असेल तर स्वच्छ होईल.2 / 5डाळींब सगळ्यात गुणकारी फळ. वर्षभर खायला हवं. थंडीत तर आवश्यक. डाळींब वाटून त्याचा रस चेहर्याला लावा. डाळींबाचं साल वाळवून त्याची पूड करुन ते मधातून खाता येतं. त्यानं पचन सुधारतं. आणि हाच लेप चेहर्याला लावला तर चेहरा मऊसूत होतं.3 / 5चारोळ्या घरात असतातच. त्यांचा लेप चेहर्याला लावता येतो. चारोळ्याची पूड मधात कालवून लावली तर थंडीतही चेहरा अत्यंत टवटवीत सुंदर दिसतो.4 / 5पपई तर अत्यंत गुणकारी. पपई आहारात हवीच. डोळ्यांसाठी उपयुक्त. पपईचा गर नियमित चेहरा आणि मानेला लावायला हवा. पपईची साल वाटून चेहर्याला लावल्यासही चेहर्याचे काळे डाग जातात.5 / 5तसं महागडं असतं अक्रोड. अक्रोड वाटून चेहर्याला लावलं तर चेहरा अत्यंत मऊ, सतेज दिसतो. चेहर्याला उत्तम मायश्चर मिळतं.