एकदा फ्रिजमधून बाहेर काढल्यानंतर 'हे' पदार्थ पुन्हा ठेवणं पडू शकतं महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 16:07 IST
1 / 6अन्नपदार्थ दिर्घकाळ टिकून राहावे यासाठी ते प्रामुख्याने फ्रिजमध्ये ठेवले जातात. मात्र काही पदार्थ हे एकदा फ्रिजमधून बाहेर काढल्यानंतर पुन्हा ठेवणं महागात पडू शकतं. अशाच काही पदार्थांविषयी जाणून घेऊया. 2 / 6मध एका बंद डब्यात नीट ठेवल्यास ते दोन वर्षे टिकते. मात्र ते फ्रिजमध्ये ठेवलं तर घट्ट होतं. तसेच त्यातील औषधी गुणधर्म कमी होतात. 3 / 6ब्रेड खराब होऊ नये म्हणून तो फ्रिजमध्ये ठेवला जातो. मात्र ब्रेड फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर त्याची चव बदलते. 4 / 6दूध फ्रिजमध्ये ठेवलं जातं. दुधामध्ये बॅक्टेरिया खूप लवकर तयार होतात. त्यामुळे दूध फ्रिजमधून बाहेर काढल्यावर दोन तासांच्या आत ठेवा. 5 / 6नॉनवेज अनेकदा फ्रिजमध्ये ठेवलं जातं आणि दोन दिवस ते खाल्लं जातं. मात्र असं करू नये कारण ते शरीरासाठी घातक ठरू शकतं. 6 / 6मेयोनीजमध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात. तसेच त्यामध्ये तेल आणि शुगर पावडर असते. मेयोनीज फ्रिजमधून बाहेर काढल्यावर पुन्हा आठ तासांच्या आत फ्रिजमध्ये परत ठेवलं नाहीत तर त्याचा वापर करू नका.