व्हॅलटांईन डे ला 'ही' गिफ्ट देऊन करा इम्प्रेस, शेवटचं तर सगळ्यात स्पेशल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 17:52 IST
1 / 10व्हॅलेंटाईन डेला अद्याप वेळ असला तरी अनेक जोडपी या दिवसासाठी उत्सुक असतात. हा दिवस खास बनवण्यासाठी त्यांना खूप काही करायचे असते.2 / 10लोक व्हॅलेंटाइन डे वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात, परंतु प्रत्येकामध्ये एक गोष्ट समान असते, ती म्हणजे आपल्या जोडीदाराला खास भेट देण्याची इच्छा.(Valentines Day Gift Idea). विशेषत: मुलींना व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने आपल्या प्रियकराला सर्वोत्तम गिफ्ट द्यायचे असते.3 / 10तुम्ही तुमच्या प्रियकराला व्हॅलेंटाईन डे ला काय गिफ्ट द्यायचे या गोंधळात असाल तर? त्यामुळे सर्वप्रथम तुमच्या त्यांना काय हवे आहे ते जाणून घ्या. प्रियकराला अशी भेट द्या, जी तो बराच काळ वापरू शकेल आणि जेव्हा तो ती पाहिल तेव्हा त्याला तुमची आठवण येईल. 4 / 10तुम्ही ट्रॅकसूट गिफ्ट करू शकता. ट्रॅकसूट मुलांसाठी खूप उपयुक्त आहेत. व्यायामापासून प्रवासापर्यंत मुलांना आरामदायक कपडे घालायला आवडतात. त्यामुळे ट्रॅकसूट हा त्यांच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. ट्रॅकसूट निवडताना, प्रियकराचा आवडता रंग आणि ट्रॅकसूट अधिक आरामदायक असेल असे लक्षात ठेवा.5 / 10मुलं अनेकदा घराबाहेर असतात. तुमच्या प्रियकराचीही अशीच परिस्थिती असेल तर तुम्ही त्याला पॉवर बँक गिफ्ट करू शकता. तुम्ही कोणत्याही दुकानात किंवा अगदी ऑनलाइनही सहज चांगली पॉवर बँक मिळवू शकता.6 / 10अनेक मुलांना घड्याळांची आवड असते. जर तुमच्या प्रियकरालाही घड्याळ घालायला आवडत असेल तर तुम्ही त्याला एक छान घड्याळ भेट देऊ शकता. घड्याळ देताना लक्षात ठेवा की त्यांच्याकडे तसेच घड्याळ नसावे . त्यांच्या फॉर्मल अटायर किंवा कॅज्युअल लुकनुसार तुम्हाला कोणत्या प्रकारची घड्याळ द्यायचं आहे हे देखील लक्षात घ्या.7 / 10बरेचदा मुलं विसराळु असतात. त्यामुळे ते त्यांच्या गोष्टी अनेकदा गमावतात. साइड बॅग हा यावर उपाय आहे. तुम्ही तुमच्या प्रियकराला साइड बॅग भेट देऊ शकता. ज्यामध्ये तो आपला फोन, चार्जर, रुमाल, मास्क, व्हिजिटिंग कार्ड इत्यादी सहज ठेऊ शकतो.8 / 10तुमच्या प्रियकराला वाढवलेली दाढी चांगली दिसत असेल तर मग त्याला अगदी हमखास तुम्ही एखादे ग्रुमिंग किट द्यायला हवे. ग्रुमिंग किट ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक मुलाला अगद हमखास हवी असते. ग्रुमिंग किट देण्यामागे कारण इतकेच आहे ते फारच ऑरगनायझर असते त्यामुळे मुलांना प्रवासात कॅरी करायला फार सोपे जाते.9 / 10तुम्ही त्यांना मस्त गेम सीडीज देऊ शकता. तुम्हाला बाजारात अनेक ठिकाणी अशा सीडीज मिळू शकतात. याशिवाय तुम्हाला ऑनलाईनही गेम सीडीज मिळू शकतात. 10 / 10कॉमिक पोस्टर (Comic Poster) तुमची आवडती व्यक्तीला तुम्हाला हसवायचे असेल तर मग तुम्ही अगदी हमखास अशाप्रकारचे गिफ्ट तुमच्या प्रियकराला द्यायला हवे.