फेस्टिव्ह सीझनमध्ये क्लासी लूक मिळवण्यासाठी साडी करेल मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 12:55 IST
1 / 6सण, समारंभात सुंदर दिसण्यासाठी महिला विशेष तयारी करतात. साडीमध्ये महिलांचं सौंदर्य अधिक खुलतं. बॉलिवूड सेलिब्रिटींना देखील साडीने भूरळ घातली आहे. गणेशोत्सवात तुम्ही ही सुंदर साडी नेसून असा करा क्लासी आणि ट्रॅडिशनल लूक.2 / 6शिल्पा शेट्टीची साडी स्टाईल नेहमीच हटके असते. पिवळ्या रंगाच्या बेल्टेड साडीत शिल्पा अत्यंत सुंदर दिसते. समारंभांना जाताना असा फ्यूजन लूक नक्की ट्राय करा. 3 / 6करिष्माची लाल साडी सिंपल असली तरी त्यासोबत तिने केलेला लूक हा सणांसाठी एकदम परफेक्ट असल्याने तुम्ही ही तसा लूक करण्याचा विचार करू शकता. 4 / 6काजोलची ब्लॅक आणि गोल्डन हेवी वर्क असलेली साडी फेस्टिव्ह सीजन लूकसाठी एकदम भारी आहे. त्यासोबत आकर्षक ज्वेलरीचा देखील वापर करा. 5 / 6माधुरी दीक्षित गुलाबी साडीत खूपच सुंदर दिसते. खास समारंभांसाठी असा लूक बेस्ट ऑप्शन आहे. 6 / 6आलियाने गणेशोत्सवात फ्लोरल प्रिंट असलेली पिवळी साडी नेसली होती. मनीष मल्होत्राने ती साडी डिझाईन केली होती. फ्लोरल प्रिंटवाली साडी नक्की ट्राय करा.