भारतीय क्रिकेटर इरफान पठाण आणि मॉडेल जिद्दाह मॉडेल साफा बेग यांच्या लग्नाचे रिसेप्शन वडोदरा येथील लक्ष्मी व्हिला पॅलेस येथे पार पडले. हे रिसेप्शन ८ मार्चला अत्यंत गॅ्रंड पद्धतीने पार पडले. बॉलीवूड, टेलिवूड, राजकारणी यांनी या रिसेप्शनला उपस्थिती नोंदवली. यात विनय कुमार, रोबिन उथप्पा, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, आर.पी.सिंग, पियुष चावला, किरण मोरे, मोहम्मद कैफ आणि अनेक क्रिकेटर्स त्यांच्या कुटुंबियांसमवेत आले होते. ओम शांती ओम अभिनेत्री युविका चौधरी, मोहित मलिक आणि कुटुंबिय हे लग्नाच्या रिसेप्शनसाठी आले होते. तसेच परिमल नाथवानी, चिरायू अमिन, रंजनबेन धनंजय भट्ट हे रिसेप्शनला उपस्थित होते. २००० आमंत्रितांनी रिसेप्शनला उपस्थिती नोंदवली. इरफान-साफा यांनी मागील महिन्यात लग्न केले होते. यात केवळ कुटुंबीय, जवळचे मित्र यांना लग्नासाठी आमंत्रण देण्यात आले होते.