2020 मध्ये दिसा स्टायलिश; 'हे' फॅशन ट्रेंड्स नक्की करा ट्राय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 14:31 IST
1 / 7सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं दमदार स्वागत करण्यात आलं आहे. या नवीन वर्षात आणखी सुंदर आणि स्टायलिश दिसायला सर्वांनाच आवडेल.2 / 7सातत्याने नवनवीन ' फॅशन ट्रेंड्स हे येत असतात. 2020 मध्ये 'हे' फॅशन ट्रेंड्स नक्की करा ट्राय3 / 7नववर्षात मोनोक्रोम ड्रेस ट्राय करून कूल लूक करा. या वर्षभरात हा ट्रेंड कायम राहणार आहे. सेम टोनच्या टोन्सच्या संपूर्ण आऊटफिटचा रंग एक असून वेगवेगळ्या टोन्समध्ये आहेत.4 / 7पोल्का डॉट्सची फॅशन ही खरं तर जुनी आहे. मात्र सध्या पुन्हा एकदा नव्याने अनेकांनी या लूकला पसंती दर्शवली आहे. 2020 मध्ये ही पोल्का डॉट्स ड्रेस सुपर स्टायलिश लूक देणार आहे. 5 / 7जंपसूट्सच्या ओरिजनल व्हर्जनमध्ये एक वनपीस ड्रेस असतो. बॉलिवूडच्या यूटिलिटी जंपसूट्समध्ये पॉकेट्स असतात. यूटिलिटी जंपसूट्सची सध्या क्रेझ पाहायला मिळत आहे. यामुळे हटके लूक मिळतो. 6 / 7स्कर्ट, टी-शर्ट पासून ते फॉर्मल सूटवर देखील स्ट्राइप्सची जादू पाहायला मिळते. स्टाइप्समुळे ग्लॅमरस दिसता येतं. 7 / 72019 प्रमाणे याही वर्षी हाय वेस्ट, लूज, लाँग स्लीव्स आणि फ्लेयर्ड डेनिम लूक रॉक करणार आहे. ओवर साइज्ड डेनिम ही कूल लूक देत असल्याने त्याचा सध्या ट्रेंड आहे.