शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खळबळजनक दावा! ८ कलश, मानवी केस, हाडे अन् कवटी...; लीलावती हॉस्पिटलमध्ये काळी जादू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 14:05 IST

1 / 9
बॉलिवूड कलाकार, अनेक राजकीय नेते ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात त्या मुंबईतील प्रसिद्ध लीलावती हॉस्पिटलबाबत अत्यंत खळबळजनक दावा करण्यात आला आहे. याठिकाणी काळी जादू करण्यात आली होती असा आरोप झाला आहे.
2 / 9
ट्रस्टी प्रशांत मेहता यांनी दावा केलाय की, हॉस्पिटलच्या माजी ट्रस्टींनी नव्या ट्रस्टींविरोधात काळ्या जादूचा प्रयोग केला होता. परमबीर सिंह हे सध्या लीलावती हॉस्पिटल ट्रस्टचे कार्यकारी संचालक आहेत. त्यांनीही यावर दुजोरा देत ज्या खोलीत प्रशांत बसतात, तिथे काळी जादू करण्यात आली होती.
3 / 9
फ्री प्रेस जर्नलच्या एका रिपोर्टनुसार प्रशांत मेहता यांच्या कार्यालयात जमिनीखाली ८ कलश सापडले. ज्यात मानवी केस, कवटी, हाडे आणि तांदूळ होते. या घटनेची दखल घेत काही साक्षीदारांच्या उपस्थितीत व्हिडिओग्राफी करून हे सगळं जमिनीतून बाहेर काढण्यात आले असं परमबीर सिंह यांनी सांगितले.
4 / 9
जमीन खोदल्यानंतर त्यात ८ कलश दिसले, त्यातून मानवी अवशेष, केस आणि हाडे होती. काळ्या जादूसाठी ज्या वस्तूचा वापर केला जातो त्या बाहेर काढल्याचं ट्रस्टींनी सांगितले. लीलावती' रुग्णालयात तब्बल १२५० कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप रुग्णालयाचे संचालक प्रशांत मेहता यांनी केला आहे.
5 / 9
लीलावतीमधील या प्रकाराबाबत व्हिडिओग्राफी करण्यात आली असून वांद्रे पोलिसांकडे हे प्रकरण नेले आहे. त्याठिकाणी महाराष्ट्र अंधश्रद्धा कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय हॉस्पिटलमधील हेराफेरीविरोधात ईडी आणि वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
6 / 9
लीलावती हॉस्पिटलच्या माजी ट्रस्टींनी पुरवठादार कंपन्यांना हाताशी धरून १२५० कोटींचा घोटाळा केल्याचा दावा सध्याच्या ट्रस्टींनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये माजी ट्रस्टींसह १७ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. माजी ट्रस्टींनी लॉकरमधील दागिनेही पळवल्याचा आरोप आहे.
7 / 9
ट्रस्टच्या माजी विश्वस्तांनी मोठ्या प्रमाणात अनियमितता, आर्थिक फसवणूक आणि निधीचा गैरवापर केल्याचे लेखापरीक्षकांनी उघड केले. वैद्यकीय क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा आहे, असा दावा ट्रस्टचे विद्यमान संचालक प्रशांत मेहता यांनी केला आहे. तसेच ईडीकडेही तक्रार केली असल्याचेही नमूद केले आहे.
8 / 9
काय आहे हॉस्पिटलचा इतिहास?- मुंबईतील प्रसिद्ध हिरे व्यापारी किर्तीलाल मेहता यांनी त्यांच्या पत्नी लीलावती मेहता यांच्या नावावर १९९७ साली या हॉस्पिटलची निर्मिती केली. मुंबईतील वाढत्या आरोग्य सेवेच्या गरजा पूर्ण करण्याच्या हेतून किर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्टची स्थापना करण्यात आली.
9 / 9
लीलावती रूग्णालयात सर्व वर्गातील लोकांना सुलभ आणि उच्च दर्जाची सुरक्षा देण्यात येते. येथील अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल वैद्यकीय टीम यामुळे मुंबईतील हे प्रसिद्ध रुग्णालय बनले आहे. बऱ्याचदा राजकीय क्षेत्रातील दिग्गज, बॉलिवूडमधील कलाकार आणि औद्योगिक क्षेत्रात नावाजलेले लोक या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात.
टॅग्स :hospitalहॉस्पिटलParam Bir Singhपरम बीर सिंग