शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

घबाड संपता संपेना..!! जंगलात सोने, नोटांचा ढीग; संपत्ती मोजून अधिकारी थकले तरीही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 15:18 IST

1 / 10
मध्य प्रदेशातील परिवहन विभागात कॉन्स्टेबल राहिलेल्या सौरभ शर्माची बेसुमार संपत्ती पाहून तपास अधिकारी चक्रावले आहेत. सध्या सौरभ शर्मा दुबईला आहे. तपास यंत्रणा त्याला भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सौरभच्या ठिकाणांवर आयकर विभाग आणि लोकायुक्त विभागाने धाड टाकून २३५ किलो चांदींसह ८ कोटींचे दागिने जप्त केलेत.
2 / 10
सौरभ शर्मा याच्या घरातून अधिकाऱ्यांना १७ लाख किंमतीची घड्याळे, १५ लाखाची लेडिज पर्स आणि हिरे, अंगठ्या सापडल्या आहेत. भोपाळच्या अरेरा कॉलनी सौरभचं घर आहे. त्याठिकाणी कार आणि अन्य साहित्य जप्त केले ज्याची एकूण किंमत २ कोटी २१ लाखाच्या आसपास आहे.
3 / 10
सौरभ शर्माच्या घरातून ५० लाखाचे सोन्याचे दागिने, १ कोटी १५ लाख रोकड जप्त केली. त्याशिवाय सौरभच्या मित्राच्या घरातून जिथे त्याने ऑफिस उघडले होते तिथे १ कोटी ७२ लाख रोकड, २३४ किलो चांदी ज्यांची अंदाजे किंमत २ कोटी १० लाख इतकी असण्याचा तपास अधिकाऱ्यांना अंदाज आहे.
4 / 10
आयकर विभागाच्या सूत्रानुसार, सौरभ भोपाळच्या शाहपूर इथं मोठी शाळा बांधत होता. त्याच्या बेकायदेशीर संपत्तीचे कागदपत्रे हाती लागली आहेत ज्याचा तपास सुरू आहे. भोपाळच्या मंडोरी गावाजवळ इनोव्हा कारमध्ये ५४ किलो सोने आणि १० कोटीची रोकड सापडली. त्याचे कनेक्शन सौरभ शर्माशी जोडले जात आहे. आयकर विभाग या कारचा मालक चेतन गौरची चौकशी करत आहे.
5 / 10
चेतन गौर हा सौरभचा वाहन चालक आणि निकटवर्तीय होता. चेतनच्या नावाने एक पेट्रोल पंप, मत्स्य व्यवासायाचं कंत्राट होते. हे सर्व मालक सौरभ शर्माचे होते चेतन हा केवळ दाखवण्याचा चेहरा होता. विश्वासू असल्याने चेतनच्या नावावर तो ही गुंतवणूक करत होता. तपास यंत्रणा अद्यापही बेनामी संपत्तीचा शोध घेण्यात गुंतले आहेत.
6 / 10
सौरभ शर्मा ग्वालियरचा रहिवासी होता. अवघ्या ७ वर्षात सौरभने कोट्यवधीची माया जमवली. २०१७ साली परिवहन विभागात वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर अनुकंपा तत्वावर त्याला तिथे नोकरी मिळाली. काही दिवसांनी ग्वालियरमध्ये चेकपोस्टवर नियुक्ती मिळाली. तिथून हळूहळू मंत्री आणि अधिकाऱ्यांशी त्याचे संबंध जुळले.
7 / 10
सौरभची पत्नी दिव्या शर्मा ही पतीचा कारभार सांभाळत होती. पेट्रोल पंप जमीन आणि सोन्यातील गुंतवणूक ही दिव्याच्या नावे होती. सौरभ शर्माने दोनदा एमपीपीएससी परीक्षा दिली आणि मुख्य परीक्षेपर्यंत पोहचला होता परंतु वडिलांच्या निधनानंतर त्याला अनुकंपा नियमात नोकरी लागली.
8 / 10
सौरभ शर्मा सध्या दुबईत आहेत तिथेही त्याची गुंतवणूक असण्याची शक्यता आहे. त्याच्या घरी आणि कार्यालयात तशी काही कागदपत्रे आढळली आहेत. सौरभ शर्माला पकडण्यात आल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. भ्रष्टाचाराच्या समुद्रातील सौरभ एक छोटा मासा आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी केली आहे.
9 / 10
तपास यंत्रणांना सौरभच्या ठिकाणांवर ५० रजिस्ट्री सापडल्या आहेत ज्यात भोपाळ, इंदूर इथल्या प्रॉपर्टीचा समावेश आहे. सौरभचा विश्वासू चेतन गौर याची कसोटीने चौकशी होत आहे. हादेखील या व्यवहारांचा मास्टरमाईंड आहे त्यामुळे तपास यंत्रणा त्याच्या आधारे मोठ्या माशापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत.
10 / 10
सौरभने केवळ ७ वर्ष नोकरी केली. त्यात तो एका मंत्र्‍याच्या संपर्कात आला आणि तिथून नोकरी सोडून दिली. कमलनाथ सरकार, शिवराज सरकार आणि आता मोहन सरकारमध्येही तो कार्यरत होता. सौरभने शाळा, हॉटेल आणि अन्य मालमत्तेत मोठी गुंतवणूक केल्याचं उघड झाले आहे.
टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सMadhya Pradeshमध्य प्रदेश