लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
निर्दयी माणूस! गर्भवती म्हशीची शिकार करुन पोटातील गर्भाचेही केले तुकडे, २५ किलो मांस जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 21:05 IST
1 / 8काही महिन्यांपूर्वी हत्तीच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला होता. केरळमध्ये आता पुन्हा एकदा प्राण्यांवरील हिंसाचाराची भीषण घटना समोर आली आहे. यावेळी केरळमध्ये शिकारींनी गर्भवती म्हशीला (Bison) मारुन तिच्या पोटातील संपूर्ण वाढलेल्या गर्भाचे तुकडे केलेत.2 / 8केरळमध्येच गरोदर हत्तीणीला स्फोटकांनी भरलेलं अननस खायला देण्याची घटना घडली होती. यात गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला होता. जूनमध्ये घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. असे असूनही केरळमधील सरकार शिकारी रोखण्यात अपयशी ठरत आहे.3 / 8टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शिकाऱ्यांनी प्रथम गर्भवती जंगली म्हशीला गोळ्या घातल्या. त्यानंतर, तिच्या गर्भाला पोटातून काढून त्याचे तुकडे केले गेले. केरळमधील मल्लापुरम जिल्ह्यातील पुंचा जंगलात ही घटना घडली.4 / 8वन्य म्हशीला भारतीय गौर असेही म्हणतात. ही प्रजाती आता धोक्यात आली आहे. ही बाब वनविभागाच्या लोकांना समजताच त्यांनी शिकारी अबूच्या घरावर छापा टाकला5 / 8या छाप्यात अबूच्या घरातून २५ किलो मांस सापडले. यानंतर इतर शिकारींनाही अटक करण्यात आली. सुरेश बाबू, बुशथन, अन्सिफ, आशिक आणि सुशील हे शिकारी आहेत. स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार या ६ जणांनी पुपाथीरीपारा परिसरातील खासगी मालमत्तेजवळ ही शिकार केली होती.6 / 8या ६ आरोपींनी भ्रूण तोडून २०० किलो मांस काढले होते. त्यानंतर ते कापून विभागले गेले. गर्भाची डोके आणि हाडे जंगलातच राहिली होती.7 / 8वन्यजीव संरक्षण अधिनियम -१९७२ अंतर्गत आता या शिकारींना किमान तीन ते सात वर्ष आणि दहा हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.8 / 8वन्य म्हैस म्हणजे बायसनची उंची ७.२ फूटांपर्यंत जाते. त्यांचे वजन ६०० ते १५०० किलो पर्यंत असते. ते ताशी ५६ किलोमीटर वेगाने धावतात.