1 / 7गुजरातमध्ये भाजपा आमदार केसरी सिंह सोळंकी आणि अन्य २५ जणांना पंचमहल जिल्हा पोलिसांनी जुगार खेळल्याच्या आणि दारू बाळगल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. सोळंकी हे गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील मातर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. 2 / 7स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजदीप सिंह जडेजा यांनी सांगितले की, पंचमहल पोलिसांनी जिल्ह्यातील पावागड परिसरानजीक असलेल्या एखा रिसॉर्टवर गुरुवारी रात्री धाड घातली होती. त्यावेळी या आमदारासह अन्य २५ जणांना पकडण्यात आले. 3 / 7या अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही केसरी सिंह सोळंकी यांच्यासह अन्य २५ जणांनी जुगार खेळताना पकडले. आम्ही त्या ठिकाणावरून दारूच्या बाटल्याही जप्त केल्या. आता पुढील तपास सुरू आहे. 4 / 7पंचमहल एलसीबीला पंचमहल जिल्ह्यातील हलोल येथील शिवराजपूर स्थित जिमीरा रिसॉर्टमध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर गुरुवारी संध्याकाळी एलसीबी आणि पावागड पोलिसांनी रिसॉर्टवर छापेमारी केली.5 / 7घटनास्थळावर भाजपा आमदार केसरी सिंह सोळंकी हे जुगार खेळताना सापडले. तसेच तिथून सहा बाटल्या विदेशी मद्यही जप्त करण्यात आले. त्याशिवाय पोलिसांनी कारसह एकूण आठ वाहने जप्त केली. 6 / 7मातर विधानसभा आमदार केशरी सिंह सोलंकी गुरुवारी दुपारी शिवराजपूरच्या जिमिरा रिसॉर्टमध्ये पोहोचले. त्यांच्यासोबत सात महिला होत्या. त्यामध्ये चार नेपाळी महिला होत्या. 7 / 7याप्रकऱणी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत रिसॉर्टमध्ये शोधमोहीम सुरू ठेवली. यादरम्यान, हर्षदभाई लालजीभाई पटेल, जयेशभाई रमेशभाई, प्रमोद सिंह वीरेंद्र सिंह क्षत्रिय, जयेशभाई लालजीभाई पटेल, गिरीशभाई काशीराम पटेल, राजेंद्रभाई लालजीभाई पटेल, केदार बसंत रोम, मंजू कुसूम पंत, हर्षबेन दीपेनभाई गोरिया, निताबेन वजुभाई पटेल, दीपेनभाई बाबूभाई पटेल, प्रफुलभाई रमाभाई पटेल, अनिलभाई रमेशभाई, निमेशभाई धीरूभाई पटेल, नरेश गणपतभाई पटेल, विक्रम मनिसिंह बसंत यांच्यास अनेक जणांना अटक केली.