By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 22:39 IST
1 / 6शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना कोर्टाने ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. मात्र, पेशाने वकील आणि बिझनेसमन असलेल्या अरबाजच्या वडिलांनी वेगळाच दावा केला आहे. आर्यन आणि अरबाजला क्रूझमध्ये जाण्याआधीच एनसीबीने पकडल्याचा दावा त्यांनी केला आहे. 2 / 6अरबाज आणि आर्यन हे मित्र आहेत. आपला मुलगा दोषी नाहीय. आर्यन आणि आरबाज यांनी त्या क्रूझमध्ये पाऊलही ठेवले नव्हते. त्यांना क्रूझमध्ये जाण्याआधीच पकडण्यात आले. आमचा भारतभरात टिंबरचा व्यवसाय आहे, असे अरबाजच्या वडिलांनी सांगितले. 3 / 6दरम्यान, आर्यन खानच्या जामिनासाठी युक्तीवाद करणारे वकील सतीश मानशिंदे यांनी काही वेळापूर्वी शाहरुख खानची भेट घेतली. दुसरीकडे आर्यन, अरबाजसोबत तिसरी व्यक्ती मुनमुन धमेचाच्या वकिलांनीही अली देशमुख यांनी अशीच स्टोरी मांडली आहे. 4 / 6मुनमुनला त्या क्रूझवर निमंत्रित करण्यात आले होते. कोरोना काळामुळे तिच्याकडे काम नव्हते. ती मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील आहे. तिला काम मिळाल्याने ती मुंबईत आली होती. 5 / 6एनसीबीला तिच्याकडे जे ड्रग सापडले ते जमिनीवर पडलेले होते. ती त्या खोलीत पाच मिनिटे आधीच गेली होती. तिच्यासोबत त्या खोलीत दोघेजण होते. मग त्या दोघांना का अटक करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. 6 / 6एनसीबीने काही वेळापूर्वी या प्रकरणातील दहावी अटक केली आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी जोगेश्वरी भागातून एका व्यक्तीला पकडले आहे. हा व्यक्ती सेलिब्रिटींना ड्रग्जचा पुरवठा करतो. त्याच्याकडून 5 लाखांची एमडी जप्त करण्यात आली आहे. त्या आधी गोरेगावमधून एकाला अटक करण्यात आली होती.