लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीवर केला चाकूहल्ला अन् स्वत:ला घेतला फास लावून
By पूनम अपराज | Updated: January 13, 2021 14:05 IST
1 / 6प्रेयसीची हत्या करून प्रियकराला आत्महत्या केली. संतप्त प्रियकराने आपल्या प्रेयसीवर धारदार चाकूने वार करुन आत्महत्या केली. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.2 / 6रागाच्या भरात पलूने आपल्या अल्पवयीन प्रेयसीवर त्याने बरेच चाकूने वार केले. या हल्ल्यात तिच्या पोटाला आणि हातांना गंभीर दुखापत झाली.3 / 6हे प्रकरण गढ़ाकोटाच्या सुभाषनगर प्रभागातील पलु हा जैन गुंजोरा गावातील आहे. जिथे राहणारा एक प्रेमी आपल्या अल्पवयीन प्रेयसीच्या गावी गेला. पलूने गावात जाऊन प्रियकराने प्रेयसीला लग्न करण्याविषयी बोलला. त्यावर तिने लग्न करण्यास नकार दिला.4 / 6घटनेनंतर पीडित मुलीला उपचारासाठी गढ़ाकोटा सामुदायिक स्वास्थ्य केंद्रात आणले होते. दुसरीकडे प्रियकर पलूने देखील गढकोटा येथे स्वत: च्या भाड्याच्या घरात जाऊन गळफास लावून घेतला. 5 / 6जखमी अल्पवयीन प्रेयसी याबाबत सांगते की, आधी आम्ही लग्नाबद्दल बोलत होतो. मी लग्न करण्यास नकार दिला असता त्याने माझ्यावर चाकूने वार केले. चाकूच्या हल्यात माझ्या हाताला आणि पोटाला दुखापत झाली आहे.6 / 6एसडीओपी अनुराग पांडे म्हणाले की, दोघांमधील संभाषणाची माहिती काढली जात आहे. यात मुलाने मुलीला चाकूने मारहाण केली, सध्या जखमी अवस्थेत ती रुग्णालयात दाखल आहे. दुसरीकडे मुलाने गळफास लावून घेतला आहे. पीडित जखमी झाल्यानंतर तिचा जबाब घेण्यात आला आहे. परिस्थिती काय होती हे तपासणीनंतरच स्पष्ट होईल. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.