ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
'या' आहेत जगातील सर्वात धोकादायक नोकऱ्या; काम करताना जीव जाण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 21:49 IST
1 / 10अंतराळवीर- अंतराळवीर होण्यासाठी अतिशय कठोर मेहनत घ्यावी लागते. मात्र अंतराळात गेल्यानंतरचं जीवन सुसह्य नसतं. यानात काही बिघाड झाल्यास जीवदेखील जाऊ शकतो. 2 / 10खनिज तेल काढणारे कर्मचारी- खनिज तेलाच्या विहिरींमध्ये काम करणारे कर्मचारी पृथ्वीच्या पोटात काम करतात. या ठिकाणी सतत दुर्घटना होण्याचा धोका असतो. 3 / 10माऊंटन गाईड- डोंगर, पर्वतांवर चढाई करताना माऊंटन गाईड महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र इतरांची चढाई यशस्वी व्हावी, यासाठी मेहनत घेणाऱ्या माऊंटन गाईड्सना मात्र जीव पणाला लावावा लागतो. 4 / 10अग्निशमन दलाचे कर्मचारी- आपण जराशी आग पाहून घाबरुन जातो. मात्र अग्निशमन दलाचे कर्मचारी भीषण आग विझवण्यासाठीही स्वत:ला झोकून देतात. अनेकदा कर्तव्य बजावताना त्यांना जीवदेखील गमवावा लागतो. 5 / 10अंगरक्षक- अंगरक्षकांचं अनेकांना आकर्षक वाटतं. मात्र हे काम अतिशय धोकादायक असतं. व्हीव्हीआयपींची सुरक्षा करताना अतिशय सतर्क राहावं लागतं. प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांचं संरक्षण करावं लागतं. 6 / 10स्टंटमॅन- चित्रपटातील स्टंट करण्याचं काम स्टंटमॅन करतात. मात्र एडिटिंगमुळे चित्रपटाचे हिरोच ते करत असल्याचं वाटून जातं. मात्र हा धोका पत्करुनही स्टंटमॅनला फार प्रसिद्धी मिळत नाही. 7 / 10बचाव दलाचे कर्मचारी- नैसर्गिक आपत्ती आल्यावर बचाव दलाचे कर्मचारी लोकांना वाचवण्यासाठी स्वत:ला झोकून देऊन काम करतात. अनेकदा लोकांना वाचवताना त्यांना स्वत:च्या जीवाची बाजी लावावी लागते. 8 / 10वैमानिक- वैमानिकांचं काम अतिशय जोखमीचं असतं. त्यांच्यावर अनेक प्रवाशांची जबाबदारी असते. त्यांची एक चूक अनेकांच्या जीवावर बेतू शकते. 9 / 10बांधकाम कर्मचारी- लोकांची स्वप्न साकार करण्याचं काम बांधकाम कर्मचारी करतात. मात्र लोकांचं भविष्य साकारताना ते स्वत:चा वर्तमान धोक्यात घालतात. 10 / 10संरक्षण दलाचे जवान- संरक्षण दलाचे जवान देशाच्या संरक्षणासाठी प्राणांची बाजी लावतात. देशासाठी प्रसंगी प्राणांचं बलिदान देण्याचीही त्यांची तयारी असते.