बँक चेकवर Rupees Only का लिहितात? जर लिहायचं राहिलं तर काय होईल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 17:15 IST
1 / 5तुम्ही अनेकदा बँक चेकद्वारे (धनादेश) आर्थिक व्यवहार केले असतील. चेकने केलेले आर्थिक व्यवहार सर्वात सुरक्षित मानले जातात. बँक चेकद्वारे पेमेंट करण्याशी संबंधित अनेक नियम आहेत. परंतु, बहुतेक लोक यापासून अनभिज्ञ असल्याचे पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात चेक रिजेक्ट होण्याचं हे कारण आहे. 2 / 5धनादेशावरील स्वाक्षरींबाबत काळजी घेण्याचं सर्वांनाच माहिती आहे. पण, तुम्हाला धनादेशावरील शब्दांमध्ये असलेल्या रकमेबाबत एक सत्य माहिती आहे का? धनादेशावरील रक्कम ही संख्या तसेच शब्दांमध्ये लिहिलेली असते. चेकवर आकडे आणि शब्दात रक्कम लिहिल्यानंतर ‘फक्त रुपये’ असे लिहिले जाते. काही लोक फक्त पैसे लिहून विसरतात किंवा सोडून देतात. पण, हे तुम्हाला महागात पडू शकते.3 / 5चेकवर स्वाक्षरी करण्यापूर्वी 'रुपये'च्या पुढे फक्त लिहायला विसरू नका. कारण, यामुळे चेकमध्ये छेडछाड करण्याचा धोका वाढतो. समजा तुम्ही १० हजार रुपये लिहिलं असेल. तर एखादा व्यक्ती त्यापुढे एक शून्य वाढवू शकतो.4 / 5चेकवर 'फक्त रुपये' लिहिल्याने अपेक्षित रकमेबद्दल कोणताही गोंधळ होणार नाही याची खात्री होते. चेकच्या बाबतीत, फसवणूक टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या कारणास्तव बँकिंग प्रणालींमध्ये ही एक स्टँडर्ड प्रक्रिया आहे.5 / 5मात्र, आता इंटरनेट बँकिंगच्या जमान्यात धनादेशाद्वारे होणारे व्यवहार कमी झाले आहेत. परंतु, जर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत धनादेश जारी करत असाल तर त्याच्याशी संबंधित नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे.