तुमचे उत्पन्न करपात्र नसेल तरीही इन्कम टॅक्स रिटर्न भरा, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 20:54 IST
1 / 7आयकर परतावा अर्थात आयटीआर दाखल करणे हे महत्त्वाचे असते. तुमचे उत्पन्न आयकर मर्यादेपेक्षा कमी असले तरी आयटीआर दाखल करावे.2 / 7आयटीआरचा वापर कर्ज, गुंतवणूक किंवा व्हिसा, आदींसाठी होतो. अनेकांच्या उत्पन्नातून टीडीएसची कपात केली जाते.3 / 7हे टीडीएसचे पैसे आयटीआर दाखल करून तुम्हाला परत मिळविता येतात. आयटीआर दाखल केलेला नसेल तर हे पैसे मिळविण्यात अडचणी येतात.4 / 7शेअर बाजारात पैसे बुडणे, व्यवसाय किंवा मालमत्तेत नुकसान आदी प्रकारे झालेले नुकसान आयटीआर दाखल करून कमी करता येते.5 / 7तुम्ही या वर्षाचे नुकसान दाखवून आयटीआर दाखल करा, पुढच्या वर्षाच्या नफ्यासोबत समायोजित करू शकता.6 / 7परदेशी प्रवासाची योजना आखत असाल, तर आयटीआर नक्की दाखल करा. अनेक देश व्हिसा देताना उत्पन्नाचा पुरावा मागतात. आयटीआर हा उत्पन्नाचा भक्कम पुरावा असतो.7 / 7बँकेकडून कर्ज घेण्यासाठी उत्पन्नाचा पुरावा द्यावा लागतो. तुम्ही आयटीआरचा वापर पुरावा म्हणून करू शकता. हे नसले तर कर्जासाठी अर्ज करता येत नाही. या पुराव्यामुळे तुमच्यावर विश्वास वाढतो.