वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 13:24 IST
1 / 8केंद्र सरकारला सर्वाधिक महसूल देणाऱ्यांमध्ये भारतीय रेल्वे विभाग आघाडीवर आहे. रेल्वे फक्त नफाच नाही तर रोजगार निर्मितीमध्येही अव्वल आहे. भारतीय रेल्वेने गेल्या काही वर्षांत आपल्या सेवांचे आधुनिकीकरण आणि गती वाढवण्यासाठी अनेक मोठी पावले उचलली आहेत. 2 / 8यामध्ये, वंदे भारत एक्सप्रेस आणि शताब्दी एक्सप्रेस सारख्या हाय-स्पीड आणि प्रीमियम गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. पण, या अलिशान गाड्या एखाद्या खासगी कंपनीच्या आहेत की सरकारच्या? हे तुम्हाला माहिती आहे का?3 / 8पहिल्यांदा आपण वंदे भारत एक्सप्रेसबद्दल बोलूया. वंदे भारत रेल्वेला पूर्वी ट्रेन १८ म्हणूनही ओळखले जात होते. ही गाडी पूर्णपणे भारतात डिझाइन आणि विकसित केली गेली आहे. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) मध्ये ही गाडी बांधली आहे.4 / 8मोदी सरकारने सुरू केलेल्या मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत या गाडीची निर्मिती करण्यात आली आहे. ती पूर्णपणे भारतीय रेल्वेच्या मालकीची आहे. म्हणजेच, वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मालमत्ता असून सरकारद्वारे चालवली जाते.5 / 8आता शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसबद्दल बोलूया. या दोन्ही गाड्या भारतीय रेल्वेद्वारे चालवल्या जातात. शताब्दी एक्सप्रेस पहिल्यांदा १९८८ मध्ये सुरू झाली आणि राजधानी एक्सप्रेस १९६९ मध्ये सुरू झाली. 6 / 8या दोन्ही गाड्यांचे उद्दिष्ट जलद, आरामदायी आणि वेळेवर प्रवास सेवा देण्यावर होते. त्यांचे संचालन आणि व्यवस्थापन देखील पूर्णपणे भारतीय रेल्वेच्या अखत्यारीत आहे.7 / 8अनेकांना वाटते की या प्रीमियम गाड्या एखाद्या खाजगी कंपनीद्वारे चालवल्या जातात. प्रत्यक्षात वंदे भारत, शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस या सर्व पूर्णपणे सरकारी नियंत्रणाखाली आहेत. त्यांच्या तिकिट बुकिंग, देखभाल, ऑपरेशन आणि विकासाशी संबंधित सर्व कामे भारतीय रेल्वेच्या विविध विभागांकडून केली जातात.8 / 8भविष्यात भारतीय रेल्वे काही गाड्या चालवण्यासाठी खाजगी सहभागाची योजना आखू शकते. परंतु, सध्या वंदे भारत, राजधानी आणि शताब्दी सारख्या प्रमुख गाड्या भारतीय रेल्वेच्या असून त्या सरकारी मालमत्तेप्रमाणे देशवासीयांची सेवा करत आहेत.