माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Radhika Merchant : मुकेश अंबानी यांची धाकटी सून राधिका मर्चंट कोण आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 18:06 IST
1 / 10राधिका मर्चंट या अंबानी कुटुंबाच्या धाकट्या सून होणार आहेत. राधिका या एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ आणि व्हाईस-चेअरमन वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे.2 / 10राधिका मर्चंट यांनी न्यूयॉर्क विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे आणि एओ पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक्स ग्रॅज्युएट आहे.3 / 10राधिकाचे कुटुंब अंबानी कुटुंबाला अनेक वर्षांपासून ओळखते आणि राधिका या देखील नीता अंबानींच्या खूप जवळ आहेत. अलीकडेच नीता अंबानी या देखील राधिकाच्या शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमात उपस्थित होत्या आणि दोघेही स्टेजवर एकत्र दिसले होते.4 / 10हा फोटो काही दिवसापूर्वीचा आहे. राधिका मर्चंट या भावी सासरे मुकेश अंबानींसोबत तिरुपती बालाजीला गेले होते.5 / 10राधीका यांना नृत्याची आवड आहे. या नृत्याचे आयोजन स्वतः अंबानी कुटुंबाने केले होते आणि ते खूप मोठ्या प्रमाणावर आयोजित केले होते. यावेळी राधीकाने सहभाग घेतला होता.6 / 10राधिका आणि अनंत काही महिन्यापूर्वीच चर्चेत आले होते. राधिकाने अंबानी कुटुंबातील मोठी सून श्लोका मेहतासोबत ईशा अंबानीच्या एंगेजमेंटमध्ये परफॉर्म केले होते त्यावेळी चर्चेत आली होती. तेव्हापासून राधिका अंबानी कुटुंबाच्या सर्व फंक्शन्स आणि इव्हेंटमध्ये उपस्थित राहते.7 / 10राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी लहानपणापासून दोघ एकमेकांना ओळखतात.8 / 10आज 29 डिसेंबर 2022 रोजी रिलायन्सचे संचालक परिमल नाथवानी यांनी अनंत आणि राधिकाला ट्विटरवर शुभेच्छा दिल्या. या ट्विटमध्ये 'दोघांची एंगेजमेंट झाली आहे आणि लवकरच लग्नही होणार आहे, असं सांगण्यात आले आहे.9 / 10अनंत आणि राधिकाची एंगेजमेंट मुंबईत झालेली नाही तर राजस्थानच्या नाथद्वाराच्या श्रीनाथजी मंदिरात झाली आहे.10 / 10परिमल नाथवानी यांनी शेअर केलेला राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा हा फोटो आहे. हा फोटो राधिका आणि अनंत यांच्या एंगेजमेंटचा आहे.