जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 14:10 IST
1 / 101) वॉल्टन कुटुंब- ब्लूमबर्गच्या यादीत वॉल्टन कुटुंब पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती : 513.4 अब्ज डॉलर्स (सुमारे 46 लाख कोटी रुपये) आहे. वॉलमार्ट ही जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी याच कुटुंबाची असून, जगभरात तिची 10 हजारांहून अधिक स्टोअर्स आहेत.2 / 102) अल नाहयान कुटुंब- हे अबू धाबीचे राजघराणे असून, शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान हे या कुटुंबाचे प्रमुख आणि संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष आहेत. या कुटुंबाची एकूण संपत्ती 335.9 अब्ज डॉलर्स आहे.3 / 103) अल सऊद कुटुंब- हे सौदी अरेबियाचे शाही कुटुंब असून, राजा सलमान बिन अब्दुलअझीज अल सऊद हे या घराण्याचे प्रमुख आहेत. या कुटुंबाची एकूण संपत्ती 213 अब्ज डॉलर्स आहे.4 / 104) अल थानी कुटुंब- कतारवर सुमारे 150 वर्षांपासून राज्य करणारे अल थानी कुटुंब जगातील प्रभावशाली शाही घराण्यांपैकी एक आहे. यांची एकूण संपत्ती 199.5 अब्ज डॉलर्स आहे.5 / 105) हर्मेस कुटुंब- युरोपमधील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेले हर्मेस कुटुंब आपल्या लक्झरी ब्रँड्समुळे ओळखले जाते. या कुटुंबाची एकूण संपत्ती 184.5 अब्ज डॉलर्स आहे.6 / 106) कोच कुटुंब- अमेरिकेतील कोच कुटुंबाची संपत्ती Koch Industries या बहुराष्ट्रीय कंपनीतून येते. यांची एकूण संपत्ती 150.5 अब्ज डॉलर्स आहे.7 / 107) मार्स कुटुंब- मार्स कुटुंब Mars Incorporated या जगातील आघाडीच्या फूड कंपन्यांचे मालक आहे. यांची एकूण संपत्ती 143.4 अब्ज डॉलर्स आहे.8 / 108) अंबानी कुटुंब- भारतातील सर्वात प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाचा जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीत समावेश आहे. अंबानी कुटुंबाची एकूण संपत्ती 105 अब्ज डॉलर्स आहे. 9 / 109) वेर्थाइमर कुटुंब-फ्रान्समधील हे कुटुंब Chanel या प्रसिद्ध लक्झरी फॅशन ब्रँडचे मालक आहे. यांची एकूण संपत्ती 85.6 अब्ज डॉलर्स आहे.10 / 1010) थॉमसन कुटुंब- थॉमसन कुटुंबाची प्रमुख कंपनी वुडब्रिज कंपनी असून, तिच्याकडे Thomson Reuters या आघाडीच्या मीडिया व डेटा कंपनीतील सुमारे 70 टक्के हिस्सेदारी आहे. यांची एकूण संपत्ती 82.1 अब्ज डॉलर्स आहे.