नोकरी सोडल्यानंतर कंपनीची आरोग्य विमा पॉलिसी सुरू राहते का? काय आहेत पर्याय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 12:22 IST
1 / 5आजकाल बहुतेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा उतरवतात असतात. कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्समध्ये कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबियांचा समावेश असतो. यामध्ये मूलभूत वैद्यकीय खर्चाचा समावेश आहे. पण, जेव्हा तुम्ही नोकरी सोडता किंवा गमावता त्यावेळी हा विमा सुरू राहतो का? असा प्रश्न अनेकजण विचारत असतात.2 / 5कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यास किंवा कंपनीने काढून टाकल्यास कॉर्पोरेट आरोग्य विमा थांबतो. म्हणजेच कर्मचारी जोपर्यंत काम करत आहे, तोपर्यंतच तो त्याचा लाभ घेऊ शकतो.3 / 5जर तुम्ही अधिक पैसे घेऊन टॉप-अप घेतले असेल तर त्यावेळी कंपनीची पॉलिसी काय आहे? त्यानुसार तुमचे पैसे रिफंड होणार की नाही? हे ठरते. म्हणजेच, तुम्हाला टॉप-अप पैसे परत मिळतील की नाही हे विमा कंपनीच्या पॉलिसीवर अवलंबून आहे.4 / 5अनेक विमा कंपन्या कॉर्पोरेट पॉलिसीचे वैयक्तिक आरोग्य पॉलिसीमध्ये रूपांतर करण्याची सुविधा देतात. अशा परिस्थितीत कंपनी सोडण्यापूर्वी, एचआर किंवा विमा एजंटला विचारुन ग्रुप हेल्थ इन्शुरन्स वैयक्तिक पॉलिसीमध्ये रूपांतरित केला जाऊ शकतो का.5 / 5ग्रुप हेल्थ इन्शुरन्स वैयक्तिक पॉलिसीमध्ये रुपांतरीत झाला तर तुमचा फायदा आहे. कारण, यामुळे तुमचा प्रतीक्षा कालावधी वाचतो. नवीन विमा घेतल्यास पुन्हा वेटींग पिरियडची वाट पाहावी लागेल.