1 / 8जेव्हा तुम्ही बँक किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेकडे कर्ज घेण्यासाठी अर्ज करता, त्यावेळी तुमचे वय, उत्पन्न, व्यवसाय, व्यवसाय कसा चालला आहे, याव्यतिरिक्त क्रेडिट स्कोअरही प्रामुख्याने विचारात घेतला जातो. त्यामुळे अधिकाधिक कर्ज मिळवण्यासाठी क्रेडिट स्कोअर कसा चांगला ठेवावा याविषयी...2 / 8...तर अर्जही नाकारला जाऊ शकतो जर क्रेडिट स्कोअर कमी असेल, तर एकतर कर्जाचा अर्ज नाकारला जाऊ शकतो किंवा कर्ज मंजूर झाल्यास जास्त व्याज द्यावे लागेल. अनेक बँका प्रथम स्कोअर पाहून कर्ज अर्जाचा विचार करायचा की नाही, हे ठरवतात.3 / 8वेळेवर ईएमआय भरा तुमच्या गृहकर्जाचा ईएमआय असो किंवा तुमचे मासिक क्रेडिट कार्ड बिल असो, चांगला क्रेडिट स्कोअर मिळवण्यासाठी वेळेवर पेमेंट करणे आवश्यक आहे. एकाही ईएमआयची डेडलाईन चुकवल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो आणि तो तोटा भरून काढण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे तारखेच्या आत पेमेंट करा.4 / 8गरज असेल तेव्हाच कर्ज घ्या प्रत्येकवेळी तुम्ही नवीन कर्जासाठी अर्ज करता, तेव्हा बँका एक किंवा अधिक क्रेडिट ब्युरोद्वारे तुमचा क्रेडिट स्कोअर तपासतात. कठीण चौकशी केल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला गरज असेल तेव्हाच कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करा.5 / 8 वापर मर्यादित ठेवा जर तुम्ही मासिक सर्कलदरम्यान तुमच्या क्रेडिट कार्ड मर्यादेच्या ३० टक्क्यांहून अधिक वापर केला असेल, तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो. स्कोअरमध्ये सुधारणा करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापर मर्यादित करायला हवा.6 / 8कर्जाची पूर्ण परतफेड करा जेव्हा तुम्ही तुमची क्रेडिट कार्ड बिले किंवा कर्ज ईएमआय पूर्ण भरत नाही, तेव्हा शिल्लक जमा होते आणि तुमचे कर्जही वाढते. यामुळे क्रेडिट स्कोअर कमी होतो. हे टाळण्यासाठी, तुमच्या कर्जाची पूर्ण परतफेड करण्याचा प्रयत्न करा.7 / 8 क्रेडिट स्काेअरचा अहवाल तपासा आपला क्रेडिट कार्ड स्कोअर बरोबर का चूक, हे पाहण्यासाठी क्रेडिट अहवाल तपासला पाहिजे. जर यात चूक असेल तर शक्य तितक्या लवकर दुरुस्त करून घ्यावी.8 / 8गॅरेंटर असल्यास लक्षात घ्या की, तुम्ही इतर कोणाच्या कर्जासाठी गॅरेंटर असाल आणि त्यांनी त्यांची देयके चुकवली तर, त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही परिणाम होईल.