1 / 8कल्पना करा की तुमच्याकडे एक कार्ड आहे आणि त्यामध्ये फक्त २० होलसाठी जागा आहे. प्रत्येक होल म्हणजे गुंतवणूक करण्याची एक संधी. एकदा तुम्ही होल केले की ती संधी कायमची निघून जाते.2 / 8वॉरेन बफे या विचारसरणीला ‘२० पंच कार्ड नियम’ म्हणतात. याचा अर्थ असा की जर तुम्हाला आयुष्यात फक्त २० वेळा गुंतवणूक करण्याचे स्वातंत्र्य असेल तर तुम्ही प्रत्येक निर्णय अतिशय हुशारीने घ्याल. हा नियम तुम्हाला हुशारीने गुंतवणूक करण्यास मदत करू शकतो.3 / 8बऱ्याचदा गुंतवणूकदार चर्चेतील शेअर्समध्ये, फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये लवकर पैसे कमविण्याच्या मागे लागतात. मात्र घाई करू नका, गुंतवणूक हुशारीने करा आणि हळूहळू पैसे कमवा, असा बफे यांच्या गुंतवणुकीचा फंडा आहे.4 / 8ज्या कंपनीचा व्यवसाय तुम्हाला समजतो अशा कंपनीत गुंतवणूक करा. न समजता गुंतवणूक करणे म्हणजे अंधारात बाण मारण्यासारखे आहे.5 / 8उद्योगात आघाडीवर असलेल्या किंवा मक्तेदारी असलेल्या कंपन्या निवडा.6 / 8चांगल्या कंपनीच्या शेअर्सला योग्य किमतीत खरेदी करा. 7 / 8स्वतःला विचारा की ही कंपनी पुढील २० वर्षे टिकेल आणि वाढेल का? जर हो असेल तर ही योग्य संधी आहे. जर तुम्ही १० वर्षे स्टॉक ठेवू शकत नसाल, तर तो १० मिनिटांसाठीही खरेदी करू नका.8 / 8एखादी गोष्ट करायची आहे म्हणून गुंतवणूक करू नका. चांगली कंपनी शोधा, वेळा घ्या आणि जेव्हा चांगली कंपनी मिळेल तेव्हा त्या कंपनीसोबत टिकून राहा.