शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आयपीएलमध्ये विराट कोहलीला मिळाले २१ कोटी, पण हातात येणार फक्त १३; ८ कोटी कुठे जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 16:58 IST

1 / 6
ऑनलाइन बिझनेस कन्सल्टन्सी कंपनी टॅक्सोलॉजी इंडियाच्या आकडेवारीनुसार, २००८ ते २०१० या काळात विराट कोहलीचा आयपीएलमधील पगार केवळ १२ लाख रुपये होता. मात्र, कोहलीच्या खेळाचा चढता आलेख आणि वाढत्या लोकप्रियतेमुळे २०२५ मध्ये त्याला २१ कोटी रुपये मानधन मिळाले आहे.
2 / 6
२०१० नंतर विराटची सॅलरी २०११-१३ मध्ये ८.२८ कोटी रुपये झाली. यानंतर २०१४ ते २०१७ पर्यंत त्याला १२.५ कोटी रुपये मिळाले. २०१८ ते २०२१ या कालावधीत १७ कोटी रुपयांचा करार झाला होता. मात्र, २०२२ ते २०२४ या काळात त्याच्या पगारात घट होऊन ती १५ कोटींवर आली. आता टॅक्सोलॉजी इंडियाच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये ती ४० टक्क्यांनी वाढून २१ कोटी रुपये झाली आहे.
3 / 6
२१ कोटी पगारासह कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमधील सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू आहे. त्याच्यापाठोपाठ जोश हेजलवूड (१२.५० कोटी) आणि भुवनेश्वर कुमार (१०.७५ कोटी) यांचा क्रमांक लागतो.
4 / 6
विराट कोहली हा 5 कोटींहून अधिक कमाई करत असल्याने हायर आयकर स्लॅबमध्ये येतो. नवीन आयकर नियमानुसार १२ ते १५ लाख रुपयांच्या उत्पन्नावर २० टक्के कर आहे. यानंतर, १५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर ३०% कर भरावा लागतो. अशा स्थितीत तो १५ लाखांहून अधिकच्या श्रेणीत येतो.
5 / 6
विराटच्या २१ कोटींच्या उत्पन्नावर ३० टक्के करानुसार ६.३ कोटी रुपयांचा कर लागेल. पण, ५ कोटींपेक्षा जास्त उत्पन्नावर २५% अधिभार लावला जातो. अशा प्रकारे ते ६.३ कोटींवर १.५७५ कोटी झाले. ६.३ कोटींच्या करावर ४ टक्के उपकर अंदाजे ३१ लाख रुपये होता. अशाप्रकारे, तिन्ही एकत्र केले तर सुमारे ८.१९ कोटी रुपयांचा कर लागतो.
6 / 6
म्हणजेच २१ कोटी रुपयांच्या पगारातून ८.१९ कोटी रुपये कर भरावा लागेल. कर कपातीनंतर ही रक्कम १२.८१ कोटी रुपये होईल. म्हणजे विराट कोहलीच्या हातात फक्त ८.१९ कोटी रुपये येतील.
टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीIPL 2025इंडियन प्रिमियर लीग २०२५Income Taxइन्कम टॅक्सIncome Tax Slabआयकर मर्यादा