भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 10:23 IST
1 / 6भारतावर दबाव आणण्यासाठी अमेरिका बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, चीन आणि अफगाणिस्तानसारख्या देशांशी मवाळ भूमिका घेत आहे. या देशांकडून खूपच कमी टॅरिफ वसूल केला जात आहे, तर दुसरीकडे भारतावर लावलेले शुल्क दुप्पट आहे.2 / 6अमेरिका भारताच्या ५ प्रमुख शेजारील देशांकडून कमी टॅरिफ वसूल करत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या चीनला अमेरिकेचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी मानले जाते, त्याच्यावरही केवळ ३० टक्के टॅरिफ लावला आहे, तर चीन सुद्धा रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांपैकी एक आहे. 3 / 6त्याचप्रमाणे, अमेरिकेने पाकिस्तानवर १९ टक्के, बांगलादेशवर २० टक्के, श्रीलंकेवर २० टक्के आणि अफगाणिस्तानवर १५ टक्के टॅरिफ कायम ठेवला आहे. चीन वगळता इतर सर्व देशांची अमेरिकेला होणारी निर्यात भारताच्या तुलनेत कमी आहे.4 / 6अमेरिकेने भारतावर लादलेला ५० टक्के टॅरिफ २७ ऑगस्टपासून लागू झाला आहे. एका अहवालानुसार, या अतिरिक्त टॅरिफमुळे भारताच्या निर्यातीला सुमारे ५.४ लाख कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. 5 / 6टॅरिफ वाढल्याने अमेरिकाला निर्यात होणारे भारतीय सामान, जसे की रत्ने-दागिने, फर्निचर, सी फूड आणि इतर उत्पादने महाग होतील. यामुळे अमेरिकेत त्यांच्या मागणीत घट होईल आणि इतर देश कमी किमतीत ही उत्पादने उपलब्ध करून देतील. इतकेच नाही, तर या निर्णयामुळे भारतात निर्यात-संबंधित उद्योगांमधील नोकऱ्यांवरही संकट येऊ शकते.6 / 6रशियाकडून भारताने तेल खरेदी केल्यामुळे भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला आहे. यावर आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 'भारताला रशियाकडून तेल आयातीबद्दल पुन्हा विचार करण्याची गरज आहे, खासकरून जेव्हा अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतावर ५०% टॅरिफ लावला आहे.' ते पुढे म्हणाले, 'यामुळे कोणाला फायदा होत आहे हे पाहावे लागेल आणि या नुकसानीपासून वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे.'