शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आता हद्द झाली! डोनाल्ड ट्रम्प यांनी पेंग्विनलाही सोडलं नाही; १० टक्के लावला टॅरिफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 15:35 IST

1 / 8
अमेरिकेने मॅकडोनाल्ड बेटावर १० टक्के टॅरिफ लादले आहे. कारण ट्रम्प आणि अमेरिकन प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, या बेटावरून अमेरिकेवर १० टक्के शुल्क लादले जाते.
2 / 8
ज्या बेटांचा उल्लेख त्यांनी केला आहे, त्या बेटावर २००० सालापासून एकही माणूस राहत नाही. या बेटाला २५ वर्षांपूर्वी निर्मनुष्य आयलंड म्हणून घोषित करण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना याची माहिती नाही असे नाही. सध्या या बेटांवर केवळ पेंग्विनसारख्या पक्ष्यांचे वास्तव्य आहे, हे ट्रम्प प्रशासनाला किंवा खुद्द राष्ट्राध्यक्षांना कसे कळले नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
3 / 8
जगाच्या नकाशावर हर्ड आणि मॅकडोनाल्ड बेट बघायला गेलं तर कुठल्यातरी कोपऱ्यात ठिपक्यासारखं दिसेल. ही छोटी जमीन हिंद महासागरात आहे. त्याचे स्थान ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका दरम्यान आहे. सध्या या बेटावर एकही मनुष्य राहत नसून फक्त पेंग्विन पक्ष्यांचे वास्तव्य आहे. ३६८ चौरस किलोमीटरचा हा भाग युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आला आहे.
4 / 8
व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे निर्जन बेट ऑस्ट्रेलियाच्या हद्दीत येत असल्याने त्यावर शुल्क लागू करण्यात आले आहे. जर आपण शुल्काच्या यादीवर नजर टाकली तर, ट्रम्प यांनी ऑस्ट्रेलिया आणि हर्ड आणि मॅकडोनाल्ड बेटावर स्वतंत्र १० टक्के शुल्क लागू केले आहे.
5 / 8
यादीनुसार, या बेटावर अमेरिकेवर १० टक्के शुल्क आकारले जाते. पण, वास्तव हे आहे की या बेटावर २००० सालापासून कोणीही राहत नाही. साहजिकच इथून कोणताही व्यापार होत नाही.
6 / 8
भारत आणि चीन यांसारख्या जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांना ट्रम्प प्रशासनाच्या शुल्कयुद्धाचा फटका तर बसला आहेच, पण अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे लोकसंख्या एखाद्या परिसरापेक्षा कमी आहे.
7 / 8
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी ट्विटरवर लिहिले की, हर्ड आणि मॅकडोनाल्ड बेटाला पृथ्वीवरील सर्वात जंगली आणि दुर्गम ठिकाणांपैकी एक मानले जाते आणि ट्रम्प यांनी त्यावरही १० टक्के शुल्क लागू केले. फ्रीमँटल बंदरातून हर्ड बेटावर पोहोचण्यासाठी १० दिवस लागतात. आज फक्त पेंग्विन, सील आणि उडणाऱ्या पक्ष्यांच्या वसाहती येथे आहेत.
8 / 8
द गार्डियनच्या वृत्तानुसार, गेल्या १० वर्षांपासून येथे कोणीही गेलेले नाही. इतकेच नाही तर ट्रम्प यांनी नॉरफोक बेटावर २९ टक्के शुल्क लावले आहे, जिथे लोकसंख्या केवळ २,१८८ आहे. हे शुल्क ऑस्ट्रेलियापेक्षा १९ टक्के जास्त आहे.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाTaxकरUSअमेरिका