1 / 7तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला पैशांची चिंता सतावत असेल किंवा तुम्हाला नोकरी करताना सोबतच आणखी पैसे कमावण्याची संधी हवी असेल तर ही माहिती नक्कीच तुमच्या कामाची आहे. तुम्हाला यासाठी आपला थोडा वेळ किंवा कामातून थोडा वेळ काढावा लागेल.2 / 7तुम्ही या माध्यमातून महिन्याला मोठी कमाई करू शकता. तुमच्यासाठी ही संधी आयआरसीटीसीनं आणली आहे. यासाठी तुम्हाला आयआरसीटीशी (Indian Railway Catering and Tourism Corporation) जोडलं जावं लागेल, त्यानंतर तुम्ही त्या माध्यमातून महिन्याला मोठी रक्कम कमावू शकता.3 / 7आयआरसीटीसी लोकांना एजंट बनण्याची संधी देत आहे. या ठिकाणी तुम्ही आयआरसीटीसीचे एजंट बनून महिन्याला लाखो रूपयांपर्यंत कमावू शकता. यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही त्यांचे एजंट बनाल.4 / 7IRCTC चे एजंट होण्यासाठी, तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल, त्यानंतर जर IRCTC ने तुमचा अर्ज स्वीकारला, तर तुम्ही IRCTC चे नोंदणीकृत एजंट व्हाल.5 / 7यानंतर तुम्ही IRCTC वरून तिकीट बुक करू शकता आणि भरपूर नफा कमवू शकता. IRCTC वेबसाइटवरून तिकीट बुकिंग एजंट बनून, तुम्हाला स्लीपर क्लास तिकीट बुक करण्यासाठी २० रुपये कमिशन मिळते. त्याच वेळी, एसी क्लासच्या तिकीट बुकिंगवर ४० रुपये कमिशन मिळते.6 / 7एजंट झाल्यानंतर, तुम्ही एका महिन्यात कोणत्याही मर्यादेशिवाय तिकीट बुक करू शकता. IRCTC एजंट बनून, तुम्हाला तत्काळ तिकिटे बुक करण्यात प्राधान्य मिळते.7 / 7एजंट देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटे देखील बुक करू शकतो. परंतु, तुम्हाला IRCTC ला एका वर्षासाठी ३,९९९ रुपये आणि २ वर्षांसाठी ६,९९९ रुपये शुल्क भरावे लागेल.