शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

क्रेडिट कार्डवर कर्ज खूप झालंय? कमी करण्यासाठी हे करा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 12:12 IST

1 / 8
देशातील मोठ्या शहरांबरोबरच छोट्या शहरांमध्येही क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापराकडे कल सध्या वाढत चालला आहे. अनेकदा क्रेडिट कार्डच्या मदतीने लोक शॉपिंग करतात आणि मग ठराविक वेळेत ते कर्ज फेडताना अडचणी येतात.
2 / 8
त्या कर्जामुळे टेन्शन तर असतेच शिवाय क्रेडिट स्कोअर खराब होतो. त्यामुळे क्रेडिट कार्डवर कर्ज खूप झाले असेल तर ते कमी करण्यासाठी काही उपाय...
3 / 8
क्रेडिट कार्डच्या कर्जातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही पर्सनल लोनची निवड करू शकता. जास्तीत जास्त ११ टक्क्यांनी पर्सनल लोन मिळते. तर क्रेडिट कार्डची बिले न भरल्यास तुम्हाला त्यावर तब्बल ४० टक्क्यांनी व्याज भरावे लागेल. अशा परिस्थितीत सर्वप्रथम पर्सनल लोन घेऊन त्यातून क्रेडिट कार्डचे बिल भरणे हा उत्तम पर्याय ठरेल. त्यानंतर तुम्ही हळूहळू पर्सनल लोनची परतफेड करू शकता.
4 / 8
जर तुमच्यावर क्रेडिट कार्डचं कर्ज जास्त असेल तर सर्वांत आधी तुम्ही तुमची एकूण रक्कम ईएमआयमध्ये रुपांतरीत करून घ्या. तुम्हाला एकाचवेळी मोठी रक्कम जमा करताना अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
5 / 8
अशात तुम्ही तुमची एकूण रक्कम ईएमआयमध्ये रूपांतरित करा. यामुळे तुम्हाला ते देणं सोपे जाईल. बर्‍याच बँका मोठ्या क्रेडिट कार्डच्या रकमा लहान हप्त्यांमध्ये विभाजित करून देतात, त्यामुळे ग्राहकांना बिलं भरणे सोपे जातं. तसंच ईएमआयवरील व्याजही कमी आहे.
6 / 8
क्रेडिट कार्डचं बिल न भरल्यास ग्राहकांना मोठा दंडही भरावा लागू शकतो. बहुतेक क्रेडिट कार्ड कंपन्या बिल न भरल्याबद्दल ग्राहकांकडून वार्षिक ४० टक्के दराने दंड आकारतात. अशा परिस्थितीत ग्राहक या कर्जामध्ये अडकत राहतो.
7 / 8
क्रेडिट कार्डवर भरपूर व्याज आकारले जाते, पण गरजेच्या वेळी ग्राहक क्रेडिट कार्ड वापरतो. अशा परिस्थितीत जर वेळेवर ते भरता आलं नाही तर, बिल भरणं ग्राहकांसाठी खूप कठीण होऊ शकतं. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड बिल कमी व्याजदर असलेल्या कंपनीकडे ट्रान्सफर करू शकता.
8 / 8
बऱ्याच वेळा अनेक कंपन्या जुन्या क्रेडिट कार्डचं बिल ट्रान्सफर करण्याची सुविधा देतात. तुम्ही जुन्या कंपनीकडे भरावं लागणारं अतिरिक्त व्याज टाळू शकता. परंतु, क्रेडिट कार्डचं बिल नवीन कंपनीकडे ट्रान्सफर करण्यापूर्वी त्यांचे चार्जेस आणि इतर फी योग्य पद्धतीने जाणून घ्या.
टॅग्स :businessव्यवसायbankबँक