1 / 7आजच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरांपासून खेड्यापाड्यापर्यंत अनेक लोक क्रेडिट कार्डचा वापर करू लागले आहेत. मात्र, क्रेडिट कार्डवर लिहिलेल्या सर्व आकड्यांचा खरा अर्थ माहीत असणारे फार कमी लोक आहेत. तर कार्डच्या १६ अंकी नंबरचा अर्थ अर्थ काय आहे ते समजून घेऊया.2 / 7क्रेडिट कार्डचा पहिला नंबर पाहताच कोणत्या कार्ड कंपनीनं म्हणजेच मेजर इंडस्ट्री आयडेंटिफायरने (एमआयआय) तो जारी केला आहे हे समजू शकते. जर तुमचे क्रेडिट कार्ड Visa चे असेल तर नंबर ४ पासून सुरू होईल. Mastercard ने जारी केल्यास त्याची सुरुवात पाच या क्रमांकापासून होईल. दुसरीकडे, जर तुमचं क्रेडिट कार्ड रुपे कार्ड असेल तर त्याचा पहिला नंबर ६ असेल.3 / 7कोणत्याही क्रेडिट कार्डवर लिहिलेल्या नंबरचे पहिले ६ अंक तुमच्या कार्डचा इश्यूअर आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच आयआयएन काय आहे हे सांगतात. याला अनेक ठिकाणी बँक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच BIN असंही म्हणतात. कोणत्या बँकेनं किंवा वित्तीय संस्थेनं क्रेडिट कार्ड जारी केलं आहे, हे या क्रमांकावरून दिसून येतं.4 / 7क्रेडिट कार्डचे पुढचे ९ अंक म्हणजे ७ व्या ते १५ व्या अंकापर्यंतचा तुमचा क्रेडिट कार्ड अकाउंट नंबर काय आहे हे सांगतो. हे खातं आपण ज्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडून क्रेडिट कार्ड घेतलं आहे त्या बँकेत किंवा वित्तीय संस्थेत असतो.5 / 7क्रेडिट कार्डच्या शेवटच्या अंकाला चेक डिजिट म्हणतात. यामुळे क्रेडिट कार्डच्या संपूर्ण क्रमांकाची पडताळणी होते. या क्रमांकाच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यांना बनावट क्रेडिट कार्ड जारी करता येणार नाही, याची काळजी बँका घेतात.6 / 7कार्डवर लिहिलेल्या १६ अंकांव्यतिरिक्त त्यावर एक्सपायरी डेटही लिहिलेली असते. हे कार्ड केव्हा दिलं जातं आणि ते किती काळ वैध राहील हे सांगितलं जातं. काही कार्डांवर फक्त वैधता लिहिलेली असते, कार्ड जारी करण्याची तारीख लिहिलेली नसते. कार्डवर महिना आणि वर्षाची माहिती लिहिली जाते, त्यावर तारीख नसते. अशा परिस्थितीत जारी करण्याची तारीख १ आणि वैधतेची तारीख ३०/३१ किंवा जी महिन्याची शेवटची तारीख असेल ती मानली जाते.7 / 7प्रत्येक क्रेडिट कार्डच्या मागील बाजूस ३ अंकी कार्ड व्हेरिफिकेशन नंबर म्हणजेच सीव्हीव्ही नंबर लिहिलेला असतो. याला कधी कधी कार्ड व्हेरिफिकेशन कोड म्हणजेच सीव्हीसी नंबर असंही म्हणतात. कार्डच्या मागील बाजूसा सिग्नेचर स्ट्रिपच्या शेवटी हा क्रमांक लिहिलेला असतो. काही प्रकरणांमध्ये, हे कार्डच्या पुढील भागावर लिहिलेलंही असतं. हा नंबर ऑथेंटिकेशनच्या एका लेअरप्रमाणे काम करतो. हेच कारण आहे की जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डनं ऑनलाइन व्यवहार करता तेव्हा तुम्हाला तिथला सीव्हीव्ही नंबरही टाकावा लागतो.