1 / 8काव्या मारन (Kavya Maran) क्रिकेटप्रेमींमध्ये खूप प्रसिद्ध आहे. ती आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादची मालकीण आहे. ऑगस्ट १९९२ मध्ये तिचा जन्म झाला. तिचं शालेय शिक्षण चेन्नई येथे पूर्ण झाले आणि वाणिज्य शाखेत पदवी घेतली. 2 / 8पुढे काव्या एमबीए करण्यासाठी लंडनला गेली. सध्या ती सनरायझर्स हैदराबाद आणि सन ग्रुपचे इतर काही व्यवसाय सांभाळते. काव्या ही कलानिधी मारन यांची एकुलती एक कन्या आहे. 3 / 8कलानिधी मारन हे सन नेटवर्कचे मालक आहेत. काव्याचा संघ सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२४ मध्ये चांगली कामगिरी केली होती. सनरायझर्सचा संघ उपविजेता ठरला. 4 / 8अंतिम सामन्यात संघाला कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव पत्करावा लागला. कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) हा संघ बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या मालकीचा आहे. यंदाच्या मोसमातील विजयासह केकेआरने आता तीन आयपीएल विजेतेपद पटकावले आहे.5 / 8शाहरुख खान हा बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. त्यांची लोकप्रियता काव्या मारनपेक्षा कितीतरी जास्त आहे. मात्र काव्या बॉलिवूडच्या बादशहापेक्षा चार पट अधिक श्रीमंत आहे. काव्या ही सन ग्रुपचे प्रमुख कलानिधी मारन यांची एकुलती एक मुलगी आहे. कलानिधी मारन हे देशातील अब्जाधीशांच्या यादीत ८२ व्या क्रमांकावर आहेत.6 / 8या रिपोर्टनुसार कलानिधी मारन यांची एकूण संपत्ती २४,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांच्याकडे अनेक टीव्ही चॅनेल्स, वर्तमानपत्रं, रेडिओ स्टेशन्स, फिल्म प्रॉडक्शन हाऊस आणि विकली मॅगझीन्स आहेत. 7 / 8याशिवाय कलानिधी मारन हे स्पाइसजेट या विमानसेवेचेही ते मालक आहेत. एक प्रकारे त्यांची सर्व मालमत्ता सध्या काव्या मारनच्याच मालकीची आहे. कारण ती त्यांची एकुलती एक मुलगी आहे. 8 / 8याउलट शाहरुख खानची नेटवर्थ जवळपास ६,००० कोटी रुपये आहे. अभिनयासोबतच तो चित्रपट निर्मितीतही आहे. त्यांचा व्हीएफएक्स स्टुडिओदेखील आहे. शाहरूख इतरही अनेक व्यावसायिक क्षेत्रात आहे. अशा प्रकारे काव्या मारन किंग खानपेक्षा चार पट श्रीमंत आहे.