1 / 8सरकारी विमा कंपनी एलआयसीच्या आयपीओची भले खूप चर्चा झाली. पण आयपीओची कामगिरी काही खास पाहायला मिळाली नाही. पहिलं तर शेअर्स डिस्काऊंटवर लिस्ट झाले आणि शेअर्सच्या किमतीतही मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे गुंतवणूकदारांची मोठी निराशा झाली. 2 / 8एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक केलेल्यांसाठी एक खुशखबर आहे. कंपनी लवकरच आपल्या पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर करणार आहे आणि यात गुंतवणूकदारांना डिव्हिडंट देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.3 / 8एलआयसीनं बीएसईला दिलेल्या माहितीनुसार ३० मे रोजी कंपनी आपल्या पहिल्या तिमाहीच्या कामगिरीची घोषणा करणार आहे. ३० मे रोजी मार्चच्या तिमाहीच्या ऑडिटेड फायनांन्शियल रिझल्टवर विचार करेल आणि अंतिम मंजुरी देईल. याशिवाय गुंतवणुकदारांना डिव्हिडेंट देण्याचा विचार देखील केला जाईल. 4 / 8बीएसईवर एलआयसीचा शेअर १.५९ टक्के वाढीसह ८२९.८५ रुपयांवर ट्रेंड करत होता. पण अजूनही शेअर इशू प्राइजच्या तुलनेत १२.५५ टक्क्यांनी खाली आहे. एलआयसी आयपीओसाठी ९०२-९४९ रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला होता. कंपनीचा शेअर बाजारात जवळपास ९ टक्क्यांच्या डिस्काऊंटसह लीस्ट झाला होता. 5 / 8एलआयसीचा आयपीओ साइज २०,५५७ कोटी रुपये होता. कंपनीचा मार्केट कॅप ५,२४,६२६.९३ कोटी रुपये आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार एलआयसीच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळत असली तरी एलआयसीकडून गुंतवणूकदारांना फायदा दिला जाऊ शकतो. 6 / 8कंपनीनं गेल्या वर्षी देखील डीव्हिडेंट दिला नव्हता. सरकार येत्या काळात एफपीओ बाजारात आणला जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे. यामुळे गुंतवणूकदारांना फायदा होऊ शकतो. 7 / 8एफपीओ गुंतवणूकदारांनी लगोलग घेतला पाहिजे यासाठी आयपीओमध्ये पैसा लावणारे फायद्यात राहणं गरजेचं असणार आहे. याची काळजी घेऊनच गुंतवणूदारांना एलआयसीच्या गुंतवणूकदारांना बंपर डिव्हिडेंट देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. 8 / 8अँजेल वनचे मुख्य सल्लागार अमर देव यांच्या मतानुसार, एलआयसीवर आंतरराष्ट्रीय परिस्थितींमुळे नकारात्मक परिणाम दिसत आहे. ही एक मोठी आणि विश्वासार्ह कंपनी आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी दीर्घ काळासाठी हे शेअर होल्ड करावेत. येत्या काही वर्षांत चांगल्या व्यवसायाची शक्यता आहे.