नोकरीची सुवर्ण संधी! TCS, Infosys, Wipro एक लाख कर्मचाऱ्यांची करणार भरती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 13:05 IST
1 / 13नवी दिल्ली: गतवर्षात कोरोनाने देशात शिरकाव केल्यापासून खबरदारीचा उपाय म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग, व्यवसाय, व्यापार बंद झाल्याचे पाहायला मिळाले.2 / 13कोरोनाची दुसरी लाट अद्यापही ओसरली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. 3 / 13असे असले तरी अर्थचक्र सुरू राहण्याच्या दृष्टीने राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. दुसरीकडे कोरोना संकटाच्या काळात अनेक क्षेत्रातील कंपन्यांना मोठा नफा झाला आहे. 4 / 13देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता प्रमुख आयटी कंपन्या नव्याने कर्मचारी भरती करण्याच्या विचारात आहेत. TCS, Infosys, Wipro आदी कंपन्यांकडून या आर्थिक वर्षात एक लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत. 5 / 13या भरती प्रक्रियेत नुकतेच पास झालेल्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या कंपन्यांकडून तिमाही आढावा घेण्यात आल्यानंतर हे दावे करण्यात येत आहेत. 6 / 13आर्थिक वर्ष २०२१ च्या सुरुवातीला विप्रोने १२ हजार कर्मचाऱ्यांची भरती केली. इन्फोसिसने ८३०० कर्मचाऱ्यांची तर, टीसीएसने २० हजार कर्मचाऱ्यांची भरती केली. 7 / 13त्यामुळे टीसीएसच्या कर्मचाऱ्यांची संख्या ५ लाखांवर पोहचली आहे. २०२१- २२ या वर्षात टाटा कन्सल्टेन्सीकडून देशात ४० हजार नव्या कर्मचाऱ्यांची भरती अपेक्षित आहे.8 / 13टीसीएसच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, आम्ही गतवर्षी भारतात ४० हजार नव्या उमेदवारांची भरती केली. यावर्षीही आम्ही ४० हजार नवी भरती करणार आहोत. 9 / 13इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण राव यांनी सांगितले की, कंपनी जागतिक स्तरावर यंदा ३५ हजार पास आउट उमेदवार घेणार आहे. मार्चच्या तिमाहीत कर्मचाऱ्यांची संख्या २.५९ लाख होती.10 / 13जूनच्या तिमाहीपर्यंत ही संख्या २.६७ लाख झाली. विप्रोने एप्रिल- जूनच्या तिमाहीत १२ हजार नवे कर्मचारी घेतले आहेत. चालू आर्थिक वर्षात आणखी ३० हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा विचार आहे.11 / 13दरम्यान, TCS ने चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहीत भरघोस नफा कमावला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत कंपनीचा नफा २८.५ टक्क्यांनी वाढून तब्बल ९ हजार ००८ कोटी रुपये झाला आहे.12 / 13गतवर्षी याच कालावधीत कंपनीला ७ हजार ००८ कोटींचा नफा झाला होता. तर, चालू आर्थिक वर्षात कंपनीचे एकत्रित उत्पन्नही १८.५ टक्क्यांनी वाढून ४५,४११ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 13 / 13उत्तर अमेरिकेतील आमचा व्यवसाय, बीएफएसआय आणि किरकोळ व्यवसायात चांगली वाढ झाली आहे. ज्याचे सकारात्मक परिणाम आता दिसत आहेत, असे टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांनी सांगितले.