दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 12:50 IST
1 / 9दिवाळी जवळ येताच प्रत्येक कर्मचाऱ्याला यावर्षी कंपनीकडून किती बोनस मिळेल, याची उत्सुकता लागते. कंपनी रोख रक्कम, मिठाई, कपडे किंवा गिफ्ट वाऊचर अशा स्वरूपात बोनस देऊ शकते.2 / 9अनेक लोकांचा गैरसमज असतो की सणासुदीला कंपनीकडून मिळालेली भेट किंवा बोनस करमुक्त असतो. परंतु, आयकर विभागाचे नियम याबद्दल काही वेगळे सांगतात.3 / 9कंपनीने कर्मचाऱ्याला दिलेली भेटवस्तू किंवा गिफ्ट वाऊचरची किंमत ५,००० रुपयांपर्यंत असेल, तर त्यावर कोणताही आयकर लागत नाही. ही मर्यादा कर्मचाऱ्यांसाठी करमुक्त आहे.4 / 9जर भेटवस्तूची किंमत (उदा. महागडा मोबाईल किंवा ज्वेलरी) ५,००० रुपयांपेक्षा जास्त झाली, तर त्या भेटवस्तूच्या संपूर्ण मूल्यावर कर लागतो.5 / 9कर्मचाऱ्याला कंपनीकडून मिळणारा रोख बोनस हा थेट पगाराचा भाग मानला जातो. या बोनसच्या रकमेला कोणतीही वेगळी सूट मिळत नाही.6 / 9रोख बोनस तुमच्या एकूण वार्षिक उत्पन्नामध्ये जोडला जातो आणि त्यावर लागू होणाऱ्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार कर आकारणी होते.7 / 9जर कर्मचाऱ्याने हा बोनस आपल्या आयकर रिटर्नमध्ये घोषित केला नाही, तर आयकर विभागाकडून कर चुकवल्याबद्दल नोटीस येण्याची शक्यता असते, त्यामुळे पारदर्शक व्यवहार ठेवा.8 / 9सध्या लागू असलेल्या २०२५ च्या नवीन कर प्रणालीनुसार, जर तुमचे वार्षिक उत्पन्न ४ लाख रुपयांपर्यंत असेल, तर कोणताही कर लागणार नाही. ही प्रणाली आता डिफॉल्ट आहे.9 / 9नवीन कर प्रणालीमध्ये १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर ६०,००० रुपयांची सवलत मिळते. मात्र, रोख बोनस हा पूर्णपणे टॅक्सेबल असल्याने तो उत्पन्नात जोडणे आवश्यक आहे.