By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 15:27 IST
1 / 9आताच्या घडीला TATA ग्रुप अनेकविध क्षेत्रात कार्यरत असून, विविध क्षेत्रातील कंपन्या दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. अगदी भारतीय बाजारपेठेपासून ते शेअर मार्केटपर्यंत टाटाच्या अनेक कंपन्या कमाल कामगिरी करत आहेत.2 / 9TATA ग्रुप देशातील सर्वांत मोठा औद्योगिक समूह असून त्यात ११० हून अधिक कंपन्या कार्यरत आहेत. टाटा समूहाची स्थापना १९०७ मध्ये जमशेदपूर, झारखंड येथे झाली आणि आताच्या घडीला समूह पाच खंडांमध्ये पसरलेला आहे.3 / 9टाटा समूहाचे असे ३६ ब्रँड आहेत जे ग्राहकांमध्ये सर्वांत विश्वासार्ह ब्रँड आहेत. अलीकडेच टीआरए रिसर्चने देशभरात एक सर्वेक्षण केले, यामध्ये जवळपास एक हजारपेक्षा जास्त ब्रँड्सचा समावेश असून, केवळ TATA ग्रुपचे ३६ ब्रँड सर्वांत विश्वासार्ह ब्रँड आहेत. 4 / 9TATA चा टायटन हा सर्वांत विश्वासार्ह ब्रँड आहे. ज्यांच्या ब्रँड रँकिंगमध्ये ३३ वरून ८ व्या स्थानावर वाढ झाली आहे. सन २०२२ साठी जाहीर झालेल्या यादीत डेल, Mi मोबाईल आणि सॅमसंग मोबाईल हे टॉप तीन ब्रँड आहेत.5 / 9टीआरए रिसर्चचे सीईओ एन चंद्रमौली म्हणाले की, याआधी या यादीत टाटा ब्रँड्सचा समावेश असायचा, पण आता ही संख्या ३६ वर गेली आहे. TATA च्या इतर उत्पादनांच्या क्रमवारीबद्दल बोलायचे झाल्यास, टाटा सॉल्ट ८ स्थानांनी झेप घेऊन १३व्या स्थानावर पोहोचला आहे.6 / 9याशिवाय तनिष्क ३४ स्थानांची झेप घेत १४व्या स्थानी पोहोचली आहे. याशिवाय TATA मोटर्स या यादीत २८व्या स्थानावर आहे. या यादीत अलीकडे जोडलेल्या ब्रँड्समध्ये टाटा संपन्न मसाले आणि टाटा कॉपर प्लस वॉटर प्युरिफायरचा समावेश आहे. 7 / 9गेल्या दोन वर्षांत टाटाने अनेक उप-उत्पादने तयार करण्याच्या क्षेत्रात प्रवेश केला आणि ग्राहकांची पहिली पसंती बनली. टाटाच्या अंब्रेला ब्रँडलाही ग्राहकांनी खूप पसंती दिली आहे.8 / 9टाटा व्यतिरिक्त, TRA रिसर्चमध्ये गोदरेज, अमूल, LG, M&M, सॅमसंगचे प्रत्येकी आठ आणि रिलायन्सचे सात ब्रँड समाविष्ट आहेत. डेलने सलग तिसऱ्या वर्षी भारतातील सर्वांत विश्वासार्ह ब्रँड म्हणून आपली घोडदौड सुरू ठेवली आहे.9 / 9त्यानंतर Mi Mobiles आणि Samsung Mobiles अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. टीआरएच्या गेल्या वर्षीच्या संशोधन अहवालात तिन्ही ब्रँड्सने अव्वल स्थान पटकावले होते, जे अजूनही अबाधित आहे.