By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 20:09 IST
1 / 7सोलर कंपनी वारी एनर्जीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये शुक्रवारी तुफान तेजी दिसून आली. शुक्रवारी वारी एनर्जीजचे शेअर्स BSE मध्ये ११ टक्क्यांहून अधिकने वधारले आणि २९८३.३५ रुपयांवर पोहोचले. इंट्राडे दरम्यान, कंपनीच्या शेअर्सने ३०२५ रुपयांच्या पातळीलाही स्पर्श केला. 2 / 7माध्यमांतील वृ्त्तांनुसार, कंपनीचे शेयर्स FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात. FTSE इंडेक्समध्ये समाविष्ट केल्यानंतर, हायर ऑर्डर इनफ्लोच्या अंदाजामुळे वारी एनर्जीजच्या शेअर्समध्ये ही तेजी दिसून येत आहे.3 / 749 मिलियन डॉलरचा असू शकतो इनफ्लो लंडन बेस्ड फायनान्शियल टाइम्स स्टॉक एक्सचेंज (FTSE) 20 जूनला आपले लेटेस्ट इंडेक्स कंपोजिशन चेंजेस अनाउंस करेल. तसेच, 23 जूनपासून इनफ्लो सुरू होणे अपेक्षित आहे. नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वॉन्टिटिव्ह रिसर्चच्या मते, वारी एनर्जीजमध्ये 49 मिलियन डॉलरचे इनफ्लो असू शकते. 4 / 7तसेच, विशाल मेगा मार्टमध्ये 115 मिलियन डॉलरचे इनफ्लो, ह्युंदाईमध्ये 56 मिलियन डॉलर आणि स्विगीमध्ये 32 मिलियन डॉलरचे इनफ्लो अपेक्षित आहे. याशिवाय, एनटीपीसी ग्रीन एनर्जीमध्ये 22 मिलियन डॉलरचे इनफ्लो येऊ शकते. यासंदर्भात मनिकंट्रोलच्या एका वृत्तात माहिती देण्यात आली आहे.5 / 7IPO मध्ये 1503 रुपयांवर होता वारी एनर्जीजचा शेअर - आयपीओमध्ये वारी एनर्जीजचा (Waaree Energies) शेअर 1503 रुपयांवर होता. वारी एनर्जीजचा आयपीओ 21 ऑक्टोबर 2024 रोजी खुला झाला होता आणि 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत ओपन होता. 6 / 7वारी एनर्जीजचा आयपीओ एकूण 79.44 पट सब्सक्राइब झाला होता. सोलर कंपनीचा शेअर 28 ऑक्टोबर 2024 रोजी बीएसईवर 2550 रुपयांवर लिस्ट झाला होता. तर, NSE मध्ये कंपनीचा शेअर 2500 रुपयांवर लिस्ट झाला होता. गेल्या तीन महिन्यांत वारी एनर्जीजच्या शेअरमध्ये 33 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.7 / 7(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)