1 / 7Top Biggest Stock Market Crashes In India's History: शेअर बाजारासाठी 'ब्लॅक मंडे' म्हणून स्मरणात राहील. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेचा परिणाम जगभरातील बाजारात दिसून येत आहे. सध्या देशांतर्गत शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे आणि अनेक देशांमध्ये वाढलेल्या तणावामुळे जगभरातील बाजारपेठेवर वाईट परिणाम झाला आहे. 2 / 7सेन्सेक्स मध्ये आज जवळपास जोरदार घसरण झाली. निफ्टीमध्येही ५ टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळाली. भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घसरण आहे. हर्षद मेहता घोटाळा आणि २००८ च्या मंदीच्या काळात गुंतवणूकदारांना बसलेल्या फटक्याची या निमित्तानं आठवण झाली. शेअर बाजारात आजपर्यंत ५ वेळा अशीच घसरण झाली आहे. त्यांच्याविषयी जाणून घेऊया.3 / 7हर्षद मेहता घोटाळा उघडकीस आल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय शेअर बाजाराला सर्वात मोठा धक्का बसला. ४००० कोटी रुपयांहून अधिकचा घोटाळा समोर आल्यानंतर सेन्सेक्स कोसळला. २८ एप्रिल १९९२ रोजी सेन्सेक्स ५७० अंकांनी म्हणजेच १२.७ टक्क्यांनी घसरला होता. शेअर बाजारातील एका दिवसातील ही सर्वात मोठी घसरण होती.4 / 7या घोटाळ्यामुळे भारतीय शेअर बाजार पुन्हा एकदा कोलमडला. शेअर बाजारातील ब्रोकर केतन पारेख याचे अनेक घोटाळे उघडकीस आल्यानंतर देशांतर्गत शेअर बाजारात खळबळ उडाली होती. सेन्सेक्स १७६ अंकांनी म्हणजेच ३.७ टक्क्यांनी घसरला. यावेळी गुजरातच्या भूकंपानेही गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढवले.5 / 7२००४ मध्ये शेअर बाजार पुन्हा एकदा एनडीएच्या पुनरागमनाची अपेक्षा करत होता. पण मतदारांनी युपीएला परत आणलं. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारला बहुमत मिळाल्यानंतर शेअर बाजारात घसरण दिसून आली होती. १७ मे रोजी सेन्सेक्स ११.१ टक्के म्हणजेच ८४२ अंकांनी घसरला होता.6 / 7लेहमन ब्रदर्सच्या बातमीनं जगभरातील शेअर बाजाराचं कंबरडं मोडलं. २१ जानेवारी २००८ रोजी सेन्सेक्स १४०८ अंकांनी म्हणजेच ७.४ टक्क्यांनी घसरला होता. मंदीनं शेअर बाजार हादरला होता. याच कालावधीत सेन्सेक्स पुढच्या काही महिन्यांत उच्चांकी पातळीवरून ६० टक्क्यांनी घसरला.7 / 7चीनपाठोपाठ संपूर्ण जगाला कोरोनाच्या महासाथीचा फटका बसल्याची बातमी येताच खळबळ उडाली होती. त्यानंतर शेअर बाजाराची परिस्थिती बिकट झाली. सेन्सेक्स २३ मार्च २०२० रोजी ३९३५ अंकांनी म्हणजेच १३.२ टक्क्यांनी घसरला होता. बाजारात घसरण होण्याचं कारण महासाथीमुळे देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन होता. टक्केवारीतील ही सर्वात मोठी घसरण ठरली आहे.