शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

५ हजारांनी सुरुवात, आता ३ कोटींचा टर्नओव्हर; डझनभर कर्मचारी, असा आहे 'पाटील काकीं'चा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 09:07 IST

1 / 8
Success Story Geeta Patil : अथक मेहनत केली तर यश हे मिळतंच. मोठं स्वप्न पाहून ते सत्यात उतरवण्यासाठी मोठ्या मेहनतीची गरज असते. आज आपण अशाच एका महिलेचा प्रवास जाणून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आपला एक ब्रँड उभा केला आहे. मुंबईच्या गीता पाटील यांनी घराच्या स्वयंपाकघरातून व्यवसाय सुरू केला आणि त्यांची उलाढाल कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यांचा 'पाटील काकी' हा ब्रँड शुद्ध महाराष्ट्रीयन पदार्थ तयार करतो आणि त्यांची विक्री करतो. त्यांना मुंबई आणि पुण्यातून हजारो ऑर्डर्स येतात.
2 / 8
त्यांचा मुलगा विनीत पाटील यानं त्यांना ब्रँडिंग आणि मार्केटिंगमध्ये मदत केली. गीता पाटील यांना स्वयंपाकाची प्रेरणा त्यांची आई कमलाबाई यांनी दिली, ज्यांनी स्वत: टिफिनचा छोटासा व्यवसाय केला होता. २०१६ मध्ये त्यांच्या पतीची नोकरी गेल्यानंतर गीता यांनी घरातूनच स्वत:चा व्यवसाय सुरू केला. पालिका कर्मचाऱ्यांना चहा-नाश्ता देऊन त्यांनी सुरुवात केली. आज 'पाटील काकी'मध्ये डझनभर लोक काम करतात. गीता पाटील यांच्या यशाच्या वाटचालीवर एक नजर टाकू.
3 / 8
मुंबईत जन्मलेल्या गीता यांचं लग्नही याच मायानगरीतच झालं. त्यांचे वडील मुंबई महानगर पालिकेत कामाला होते. त्यांची आई होम शेफ होती. गीता पाटील यांना स्वयंपाकाची प्रेरणा आई कमलाबाई यांच्याकडून मिळाली. त्या सुमारे २० लोकांसाठी टिफिन सेवा चालवत असे. गीता पाटील या लहानपणापासून आईला स्वयंपाकघरात मदत करायच्या. आईकडून शिकलेली ही कला पुढे स्वत:च्या व्यवसायाचा पाया बनली.
4 / 8
पतीची नोकरी गेल्यानंतर २०१६ मध्ये गीता घरुनच पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ बनवून विकायला सुरुवात केली. मोदक, पुरणपोळी, चकली, पोहे, चिवडा हे पदार्थ त्यांच्या सुरुवातीच्या मेन्यूमध्ये होते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच हजार रुपयांची अत्यल्प गुंतवणूक करावी लागली.
5 / 8
गीता पाटील यांनी बनवलेले पदार्थ लोकांना इतके आवडले की हळूहळू त्यांचे ग्राहक वाढत गेले. आज 'पाटील काकी' तीन हजारांहून अधिक ग्राहकांना सेवा देत आहेत. कंपनीची वार्षिक उलाढाल तीन कोटी रुपयांहून अधिक आहे.
6 / 8
२०२० मध्ये जेव्हा कोरोनाची महासाथ आली त्यापूर्वी सर्व काही व्यवस्थित चाललं होते. पण करोनामध्ये सगळं थांबलं. लॉकडाऊनमध्ये फक्त ऑनलाइन व्यवसाय सुरू होते. तेव्हा गीता पाटील यांनीदेखील ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. त्यांच्या २० वर्षीय मुलानं त्यांच्यासाठी एक वेबसाईट तयार केली. त्यांनी 'पाटील काकी' या नावाने सर्व पदार्थ विकण्यास सुरुवात केली. त्यांचा व्यवसाय झपाट्यानं वाढला. त्यांनी गरजू महिलांना नोकरीही दिली.
7 / 8
जसजशी टीम वाढत गेली तसं गीता पाटील यांनी आपला व्यवसाय मोठ्या ठिकाणी हलवला. आज 'पाटील काकी'मध्ये ५० हून अधिक लोक काम करतात. त्यांचा मुलगा विनीत आणि त्याचा मित्र दर्शील ऑनलाइन प्लॅटफॉर्म सांभाळतात. स्टार्टअपला शार्क टँक इंडियाकडून ४० लाख रुपयांची गुंतवणूकही मिळाली.
8 / 8
जसजशी टीम वाढत गेली तसं गीता पाटील यांनी आपला व्यवसाय मोठ्या ठिकाणी हलवला. आज 'पाटील काकी'मध्ये ५० हून अधिक लोक काम करतात. त्यांचा मुलगा विनीत आणि त्याचा मित्र दर्शील ऑनलाइन प्लॅटफॉर्म सांभाळतात. स्टार्टअपला शार्क टँक इंडियाकडून ४० लाख रुपयांची गुंतवणूकही मिळाली.
टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी