SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 09:57 IST
1 / 8SIP calculation: एसआयपी गुंतवणूक हा प्रत्येकासाठी त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. खरं तर, एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्याने केवळ गुंतवणूकीची शिस्त लागत नाही तर चक्रवाढीची जादू दीर्घकाळात उत्तम परतावा देखील देते. एसआयपीमध्ये ₹४,५००, ₹५,५००, ₹६,५००, ₹७,५०० गुंतवून तुम्ही एक मजबूत फंड तयार करू शकता. तर चला जाणून घेऊया की या गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्ही कधी कोट्यधीश होऊ शकता2 / 8एसआयपीमध्ये योग्य रक्कम गुंतवून, तुम्ही स्वतःसाठी एक मजबूत निधी सहज तयार करू शकता. हो, जर तुम्ही एसआयपीमध्ये ₹४५००, ₹५५००, ₹६५०० किंवा ₹७५०० गुंतवले तर तुम्ही वेगवेगळ्या कालावधीत १५ टक्के वार्षिक व्याजदरानं कोट्यधीश होऊ शकता.3 / 8जर तुम्ही मासिक SIP द्वारे दीर्घकाळासाठी लहान रक्कम गुंतवली तर तुम्ही एक चांगला फंड तयार करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही दरमहा ₹४,५०० चा SIP सुरू केला, तर २४ वर्षांत, एकूण ₹१२,९६,००० लाख गुंतवून, तुम्हाला १५ टक्के अंदाजे परतावा मिळून ₹९४,३९,८५२ लाख जमू शकतात, ज्यामध्ये मॅच्युरिटीवर एकूण फंड ₹१,०७,३५,८५२ कोटी होऊ शकतो. विशेष म्हणजे हे आकडे २४ वर्षांत १५% वार्षिक परताव्याच्या अंदाजे दरावर आधारित आहेत.4 / 8जर तुम्ही दरमहा ₹५,५०० चा मासिक SIP सुरू केली तर २३ वर्षांत तुम्ही एकूण ₹१५,१८,००० लाख गुंतवाल. ज्यामध्ये १५ टक्के परतावा दरानं तुम्हाला ₹९८,३०,१२९ लाख परतावा मिळू शकतात, ज्यामध्ये मॅच्युरिटीवर एकूण फंड ₹१,१३,४८,१२९ कोटी होऊ शकतो.5 / 8जर एखाद्या गुंतवणूकदारानं दरमहा ₹६,५०० चा SIP सुरू केला तर ती व्यक्ती फक्त २१ वर्षांत कोट्यधीश होऊ शकतात. ₹६,५०० ची गुंतवणूक २१ वर्षांत ₹१६,३८,००० लाख होईल. यामुळे १५% दरानं ₹८३,६६,०७६ लाखांचा अंदाजे परतावा मिळू शकतो, ज्यामध्ये मॅच्युरिटीवर फंड ₹१,००,०४,०७६ कोटींचा होऊ शकतो. विशेष म्हणजे हे आकडे २१ वर्षांत १५% वार्षिक परताव्याच्या अंदाजे दरावर आधारित आहेत.6 / 8जर तुम्ही दरमहा SIP मध्ये ₹७,५००० गुंतवले तर तुम्ही निवृत्तीपूर्वी कोट्यधीश होऊ शकता. जर तुम्ही २१ वर्षांसाठी ₹७,५०० ची SIP केली तर एकूण गुंतवणूक ₹१८,९०,००० लाख होईल, या गुंतवणुकीवर अंदाजे १५ टक्के परतावा पकडल्यास ती रक्कम ₹९६,५३,१६५ लाख होऊ शकते, ज्यामध्ये फंड मॅच्युरिटीवर ₹१,१५,४३,१६५ कोटी होऊ शकतो.7 / 8जर तुम्ही दरमहा ₹४५००, ₹५५००, ₹६५०० किंवा ₹७५०० चा SIP सुरू केली, तर तुम्ही केलेल्या या छोट्या बचती दीर्घकाळात कोट्यवधींची संपत्ती निर्माण करू शकतात. अशा परिस्थितीत, SIP हा एक पर्याय आहे ज्याद्वारे तुम्ही शिस्तबद्ध गुंतवणुकीद्वारे तुमचं भविष्य सुरक्षित करू शकता. पण यातील जोखीमही लक्षात घेणं आवश्यक आहे.8 / 8जर तुम्ही दरमहा ₹४५००, ₹५५००, ₹६५०० किंवा ₹७५०० चा SIP सुरू केली, तर तुम्ही केलेल्या या छोट्या बचती दीर्घकाळात कोट्यवधींची संपत्ती निर्माण करू शकतात. अशा परिस्थितीत, SIP हा एक पर्याय आहे ज्याद्वारे तुम्ही शिस्तबद्ध गुंतवणुकीद्वारे तुमचं भविष्य सुरक्षित करू शकता. पण यातील जोखीमही लक्षात घेणं आवश्यक आहे.