शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

घर खरेदी करावे की भाड्याने राहावे? समजून घ्या कशात होईल लाखोंचा नफा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 07:36 IST

1 / 6
आपले स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाला वाटत असते. भले मग घर कर्ज काढून का घेणे होईना, भाड्यामध्ये जेवढे पैसे जातात, त्यात थोडेसे आणखी पैसे टाकल्यास घरासाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता निघून जातो, असा युक्तिवाद त्यासाठी केला जातो.
2 / 6
काही लोकांना मात्र असे वाटते की, घर खरेदी करण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहिलेले फायदेशीर आहे. घरभाडे हे ईएमआयपेक्षा कमीच असते. उरलेले पैसे गुंतवून मोठा परतावा मिळू शकतो. हा तिढा सोडविण्यासाठी काही कॅल्क्युलेशन्स समजून घेऊ या.
3 / 6
समजा तुम्ही ५० लाखांचे घर खरेदी केले. १० लाख रुपये डाऊन पेमेंट केले आणि ४० लाख रुपयाचे कर्ज २० वर्षे मुदतीसाठी घेतले. ९ टक्के व्याज दराने तुमचा मासिक हप्ता ३६ हजार रुपये होईल. तुम्ही २० टक्के कर ब्रॅकेटमध्ये असाल तर कर सवलतीसह तुमचा प्रत्यक्षातील हप्ता ७.२ टक्के व्याज दराने ३१,५०० रुपये होईल. त्यानुसार, २० वर्षांत तुमचे ३६ लाख रुपये व्याजात जातील.
4 / 6
२० वर्षात एकूण ८६ लाख रुपये तुम्हाला भरावे लागतील, वार्षिक ७ ते ८ टक्के दराने घराच्या किमती वाढल्यास २० वर्षांनी घराची किंमत १.९० कोटी रुपये होईल. म्हणजेच तुम्हाला १.०४ कोटींचा लाभ होईल.
5 / 6
१५ हजार रुपयांचे भाडे असलेले घर तुम्ही २० वर्षांसाठी वापरले असेल, तर कर सवलतीत एचआरएचा लाभ मिळेल. तुम्ही २० टक्क्याच्या ब्रॅकेटमध्ये असाल, तर कर सवलत धरून तुम्हाला प्रत्यक्षातील भाडे १२ हजारच पडेल. भाडे वार्षिक ८ टक्के दराने वाढले तर २० वर्षांत तुम्हाला ६६ लाख भाडे द्यावे लागेल. शिवाय तुमचे डाऊन पेमेंटचे १० लाख रुपये वाचलेले आहेत. त्यावर १० ते १२ टक्के परतावा कमावू शकता.
6 / 6
२० वर्षांत १० लाखांचे ६७ लाख रुपये होतील. दर महिन्याला ३६ हजाराऐवजी १२ हजारांचा ईएमआय तुम्हाला द्यावा लागेल. म्हणजेच दर महिन्याला २४ हजार रुपये वाचतील. त्यावर १० टक्के परतावा मिळाल्यास २० वर्षात तुमच्याकडे १५ कोटी रुपये असतील.
टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनbusinessव्यवसायbankबँक