₹2 च्या शेअरचं 'तुफान'! फक्त 4 वर्षात ₹1500 वर पोहोचला भाव, दिला 75000% चा परतावा; आता कंपनीनं घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 08:51 IST
1 / 9शेअर बाजारात सध्या वारी रिन्युएबल कंपनीच्या शेअर्सचे तुफान बघायला मिळत आहे. शेअर बाजारात एकिकडे मोठी घसरण सुरू असताना, दुसरीकडे या सोलर बिझनेसशी संबंधित कंपनीचा शेअर मंगळवारी 5% च्या अप्पर सर्किटसह 1551.65 रुपयांवर पोहोचला आहे.2 / 9वारी रिन्यूएबल (Waaree Renewable)चा शेअर गेल्या केवळ 4 वर्षातच 2 रुपयांवरून 1500 रुपयांपर्यंत वाधारला आहे. या मल्टीबॅगर कंपनीच्या शेअरने या काळात आपल्या गुंतवणूकदारांना 75000% पेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे. 3 / 9कंपनीचा शेअर 20 मार्च 2020 रोजी 2.06 रुपयांवर होता. तो आता 1551.65 रुपयांवर पोहोचला आहे.4 / 9वारी रिन्यूएबलने (Waaree Renewable) अपला स्टॉक स्प्लिट केला आहे. शेयर स्प्लीटची रेकॉर्ड डेट 15 मार्च 2024 होती. सोलर कंपनीने 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरची 2 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअर्समध्ये विभागणी केली आहे. 5 / 9वारी रिन्यूएबलने आपल्या गुंतवणुदारांना एकदा बोनस शेअर्सचं गिफ्टदेखील दिलं आहे. कंपनीने जुलै 2014 मध्ये 57:100 या प्रमआणात बोनस शेअर दिले आहेत. अर्थात, वारी रिन्यूएबलने आपल्या गुंतवणूकदारांना 100 शेअर्सवर 57 शेअर्स दिले आहेत.6 / 9एका वर्षात दिला 971% परतावा - वारी रिन्युएबलच्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात तब्बल 971% एवढी वाढ झाली आहे. 20 मार्च 2023 रोजी कंपनीचा शेअर 144.82 रुपयांवर होते. जो 19 मार्च 2024 रोजी 1551.65 रुपयांवर पोहोचला आहे.7 / 9गेल्या 6 महिन्यांचा विचार करता, वारी रिन्युएबलचा शेअर 531% ने वधारला आहे. गेल्या 6 महिन्यांत सोलर कंपनीचा शेअर 245.65 रुपयांवरून 1551.65 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. 8 / 9या वर्षाचा विचार करता, वारी रिन्युएबलचा शेअर आतापर्यंत 253% ने वधारला आहे. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1641 रुपये आहे. तर निचाक 136.02 रुपये आहे.9 / 9(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)