SBI'च्या चार जबरदस्त स्कीम्स! तुम्हालाही करोडपती बनवतील; वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 13:05 IST
1 / 8आपल्याकडे गुंतवणूक अनेकजण करतात. सुरक्षित गुंतवणुकीसाठी एफडी गुंतवणूकदारांची पहिली पसंती आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाही एफडीला सर्वात जास्त व्याजदर देत आहे.2 / 8स्टेट बँक ऑफ इंडियाने अमृत कलश योजना विशेष एफडी योजना सुरू केली आहे. या योजनेत गुंतवणुकीची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२४ आहे. या FD चा कालावधी ४०० दिवसांचा आहे आणि यामध्ये ग्राहकाला ७.१० टक्के व्याज मिळत आहे.3 / 8या योजनेत हमी व्याज उपलब्ध आहे आणि गुंतवणूकदार त्रैमासिक, मासिक किंवा अर्धवार्षिक व्याज पेमेंटचा कोणताही पर्याय निवडू शकतात. या योजनेत मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढल्यास ०.५ टक्के ते १ टक्के व्याज कापले जाते. कालावधी - ४०० दिवस व्याजदर- ७.१० टक्के4 / 8SBI WeCare FD योजना देखील खूप लोकप्रिय आहे. यामध्ये उच्च व्याजदर दिला जातो. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना ०.५ टक्के अतिरिक्त व्याज मिळते.5 / 8सध्या गुंतवणूकदारांना एफडी योजनेत ७.५० टक्के व्याज मिळत आहे. या FD योजनेतील गुंतवणूक किमान ५ वर्षे आणि कमाल १० वर्षांसाठी आहे. कालावधी - ५ वर्षे ते १० वर्षे व्याजदर- ७.५० टक्के6 / 8स्टेट बँक ऑफ इंडियाची ‘अमृत दृष्टी’ एफडी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा कालावधी ४४४ दिवसांचा आहे. सध्या बँक ७.२५ टक्के व्याज देत आहे. या योजनेतही ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के अतिरिक्त व्याजाचा लाभ मिळतो. या एफडी योजनेत जास्तीत जास्त ३ कोटी रुपये गुंतवू शकता. कालावधी- ४४४ दिवस व्याजदर- ७.२५ टक्के, जास्तीत जास्त गुंतवणूक- ३ कोटी रुपये.7 / 8SBI सर्वोत्तम FD योजना अनेक सरकारी योजनांच्या तुलनेत जास्त व्याज देते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही फक्त १ किंवा २ वर्षांची योजना आहे. याचा अर्थ कमी कालावधीत मोठा फायदा.8 / 8या योजनेत ग्राहकाला ७.४ टक्के व्याज मिळते. तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६ टक्के व्याज दिले जाते. कालावधी - १ ते २ वर्षे व्याज दर – ७.४ टक्के ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर – ७.६० टक्के.