By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 09:40 IST
1 / 6SBI Home Loan: भारतीय रिझर्व्ह बँकेनं ८ एप्रिल रोजी मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीतील निर्णयांची घोषणा केली. आरबीआयच्या पतधोरण समितीनं रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कर्जाच्या व्याजदरात कोणतीही नवीन कपात होणार नाही. 2 / 6मात्र, गेल्या वर्षी आरबीआयनं रेपो रेटमध्ये १.२५ टक्क्यांची कपात केली होती, ज्यामुळे होम लोनसह इतर सर्व कर्जे स्वस्त झाली आहेत. आता आपण जाणून घेऊया की, नोकरी करणाऱ्या व्यक्तीला भारतीय स्टेट बँकेकडून (SBI) ५० लाख रुपयांचं होम लोन घेण्यासाठी किती पगार असणं आवश्यक आहे.3 / 6आरबीआयने गेल्या वर्षी केलेल्या रेपो रेट कपातीनंतर, स्टेट बँकेनेही आपले व्याजदर कमी केले आहेत. सध्या बँक ७.२५ टक्के या सुरुवातीच्या व्याजदराने होम लोन देत आहे. या व्याजदराने ५० लाख रुपयांचे कर्ज घेण्यासाठी पगाराची अट काय असेल, जाणून घेण्याचा प्रयत्न करू.4 / 6जर तुम्हाला ३० वर्षांच्या कालावधीसाठी ५० लाख रुपयांचं कर्ज हवं असेल, तर तुमचा मासिक पगार किमान ६९,००० रुपये असणं आवश्यक आहे. २५ वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज घ्यायचे असल्यास, तुमचा पगार किमान ७३,००० रुपये असायला हवा. २० वर्षांच्या कालावधीसाठी ५० लाख रुपयांचं होम लोन मिळवण्यासाठी तुमचा मासिक पगार किमान ८०,००० रुपये असणं गरजेचं आहे.5 / 6कर्जाच्या या गणितानुसार, तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींची दखल घ्यावी लागेल. तुमच्या नावावर आधीपासून कोणतेही दुसरं कर्ज सुरू नसावं. जर तुमचं आधीच एखादे कर्ज सुरू असेल, तर ६९,००० रुपये पगार असूनही तुम्हाला ३० वर्षांसाठी ५० लाख रुपयांचे कर्ज मिळू शकणार नाही.6 / 6यासोबतच, तुम्हाला तुमच्या क्रेडिट स्कोअरची (Credit Score) विशेष काळजी घ्यावी लागेल. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल, तर कर्ज मिळणं कठीण होऊ शकतं. होम लोन मिळवण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर उत्तम असणं अत्यंत आवश्यक आहे.